एमसीए कोल्टस आणि पारसी जिमखाना यांच्यात जेतेपदासाठी झुंज
आरएफएस तल्यारखान स्मृती निमंत्रित टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील जेतेपदासाठी एमसीए कोल्टस आणि पारसी जिमखाना संघ एकमेकांशी भिडतील. उपांत्य फेरीत एमसीए कोल्ट्सने पी.जे. हिंदू जिमखान्यावर 4 विकेट राखून मात केली. दुसऱ्या लढतीत पारसी जिमखान्याने क्रिकेट क्लब ऑफ इंडियावर (सीसीआय) 6 विकेट राखून विजय मिळवला.
बॉम्बे जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात जय बिस्ताच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पी.जे. हिंदू जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 183 धावा केल्या. मात्र एमसीए कोल्ट्सने 19.4 षटकांत 6 विकेटच्या बदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले. दिव्यांश सक्सेनाने 41 चेंडूंत 62 धावांची करताना त्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. सुवेद पारकरने 29 धावा काढत त्याला चांगली साथ दिली.
दुसऱ्या सामन्यात सीसीआयचे 204 धावांचे आव्हान पारसी जिमखान्याने 19.3 षटकांत 4 विकेट राखून पार केले. त्यात ईशान मुलचंदानीने सर्वाधिक 74 धावा केल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List