तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडप्रमाणे मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांचे अपटेड जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मराठी कलाकारांमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. त्यातल्या त्यात प्राजक्ताचे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय आहे. खरंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या शोमुळे प्राजक्ताला एक वेगळी ओळख मिळाली आहे. शो मध्ये तिचे ‘वाह दादा वाह’ सारखे अनेक डायलॉग,तिचं हसणं, तिचा डान्स किंवा तिचं निवेदन करण्याची पद्धत असो, सगळ्यांचेच मिम्स आणि रील हे बनतच असतात.
मीडिया इन्फ्लुएन्सरने केली प्राजक्ताची हुबेहूब नक्कल
पण आता प्राजक्ताच्या याच हटके अंदाजाची एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने हुबेहूब नक्कल केली आहे. तिने केलेली प्राजक्ताची नक्कल पाहून खरोखरच प्राजक्ताचाच आवाज ऐकल्यासारखं वाटतं. या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे नाव आहे पूजा दलाल. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पूजाने प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल केल्याचं पाहायला मिळत आहे. पूजा सेम टू सेम प्राजक्तासारखीचं हसत आहे, प्राजक्ताचा प्रसिद्ध असलेले डायलॉग म्हणजे ‘वाह दादा वाह’, ‘वाह गौऱ्या’, ‘नाही रे नाही…’, ‘बरं…हं…हं’ असे अनेक डायलॉग पूजा या व्हिडीओमध्ये म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे. तेही प्राजक्ता देते तसेच हावभाव पूजाने केले आहेत.
नम्रता संभेराव, पृथ्वीक प्रतापसह अनेकांच्या व्हिडीओवर कमेंट्स
पूजाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी सेलिब्रिटींनी देखील कमेंट्स केल्या आहेत. नम्रता संभेराव, पृथ्वीक प्रताप, अमृता खानविलकर, सौरभ चौघुले, निखिल बने, स्वप्नील राजशेखर या सगळ्या कलाकारांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, नेटकऱ्यांनी “भारी जमलंय”, “बहारदार परफॉर्मन्स”, “सोनी टीव्ही मराठीकडून तुम्हाला मानाचा मुजरा!”, “प्राजक्ता माळीला टॅग करा”,“वाह दादा वाहचा लूप संपतच नाहीये…कमाल” अशा अनेक भन्नाट कमेंट्स या व्हिडीओवर आलेल्या पाहायला मिळत आहेत.
प्राजक्ताची प्रतिक्रिया काय?
दरम्यान या व्हिडीओवर अजून प्राजक्ताने प्रतिक्रिया दिलेली नाहीये. आता या व्हिडीओवर स्वत:ची हुबेहूब नक्कल पाहून ती काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांच नक्कीच लक्ष आहे. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शो मुळे प्राजक्ताला एक नवीन ओळख मिळाली. प्राजक्तासह इतर कलाकारांनाही या शोने जगभरात नाव मिळून दिलं आहे. हास्यजत्रेचे कलाकार अनेकदा परदेश दौऱ्यावर जाऊन तेथील चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करतात. तिथेही त्यांना तेवढंच प्रेम मिळतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List