वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची मुलगी होती ‘ही’ अभिनेत्री, एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं आयुष्य
Bollywood Actress Life: सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे त्या अभिनेत्रीचं नाव निम्मी असं आहे. बॉलिवूडला अनेक हीट सिनेमा देणाऱ्या निम्मा हिचं करीयर एका चुकीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. निम्मा हिने 1949 ते 1965 दरम्यान अनेक हीट सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘बरसात’, ‘आन उडन खटोला’, ‘बसंत बहार मेरे मेहबूब’, ‘लव्ह एन्ड गॉड’ अशा अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत निम्मी हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. निम्मी यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीची आई वाहीदा बानो एक वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला होत्या. तर अभिनेत्रीचे वडील अब्दुल हकीम तेव्हा प्रसिद्ध ठेकादार होते.
निम्मी फक्त 11 वर्षांची असताना आईचं निधन झालं. त्यानंतर निम्मी यांचा सांभाळ आजी – आजोबांनी केला. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर निम्मीचे कुटुंब मुंबईत आले. दरम्यान, निम्मीची भेट राज कपूरशी झाली, जे ‘बरसात’ सिनेमाचं दिग्दर्शन करणार होते आणि त्यावेळी ते एका तरुण अभिनेत्रीच्या शोधात होते.
राज कपूर यांनी निम्मीला पाहिलं आणि ‘बरसात’ सिनेमात अभिनेते प्रेम नाथ याच्यासोबत निम्मीला कास्ट करण्यचा निर्णय घेतला. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर निम्मीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. एका रात्रीत निम्मीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली.
एवढंच नाही तर, त्या काळात निम्मी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींच्या काळात अव्वल स्थानी होती. अभिनेत्रीने स्वतः खुलासा केला होती, ती एका सिनेमासाठी अभिनेत्री 3 लाख रुपये मानधन घेते. रिपोर्टनुसार, निम्मी हिला एका हॉलिवूड सिनेमाची ऑफर आली. पण सिनेमात इंटिमेट सीन असल्यामुळे अभिनेत्रीने नकार दिला.
अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत निम्मीने स्क्रिन शेअर केली. पण करीयरमधील एक चूक अभिनेत्रीला महागात पडली. ‘मेरे मेहबूब’ सिनेमासाठी सर्वात आधी निम्मीला विचारण्यात आलं. पण अभिनेत्रीने सिनेमासाठी नकार दिला. हीच एक चूक निम्मीला महागात पडली.
सिनेमासाठी निम्मीने नकार दिल्यानंतर दिग्दर्शकांनी अभिनेत्री साधना शिवदासानी हिला कास्ट करण्याचा निर्णय घेतला आणि बॉक्स ऑफिसवर सिनेमाने बक्कळ पैसा कमावला. चाहत्यांना देखील सिनेमा प्रचंड आवडला. ‘मेरे मेहबूब’ सिनेमामुळे साधना शिवदासानी करीयरला नवे पंख मिळाले, तर निम्मी हिचे करीयर फ्लॉप ठरलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List