घटस्फोटानंतर धनश्रीच्या नव्या आयुष्याची सुरुवात, आनंदाची बातमी देत म्हणाली, ‘सगळा देवाचा प्लॅन…’
Dhanashree Verma Life after Divorce: भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल सध्या त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. कोरियोग्राफर धनश्री वर्मा हिला घटस्फोट दिल्यानंतर चहल याने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे धनश्री हिने देखील नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. नुकताच धनश्री हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत धनश्री हिने कॅप्शनमध्ये ‘सगळा देवाला प्लॅन आहे…’ असं म्हटलं आहे. सध्या सर्वत्र धनश्री हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
धनश्री हिच्या नव्या आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, धनश्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. धनश्री सध्या तिच्या पहिल्या सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. सिनेमाच्या टीमसोबत फोटो पोस्ट करत धनश्री म्हणाली, ‘अखेर रॅप अप झालं आहे… माझा पहिला सिनेमा… माझ्यासाठी प्रचंड खास आहे… सिनेमा हैदराबासाठी देखील खास आहे. सिनेमा पूर्ण केल्याचा अनुभव फार वेगळा असतो… उत्साही आणि मनावर दडपण देखील आहे…
माझी सुपर टीम आणि दिल राजू प्रॉडक्शनसोबत चांगला वेळ घालवला आहे… लवकरच चित्रपटगृहात भेटू… सगळा देवाचा प्लॅन आहे…’ असं देखील धनश्री पोस्टमध्ये म्हणाली आहे.
सध्या धनश्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण सिनेमाबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही. सिनेमाचं शिर्षक आणि सिनेमातील धनश्रीच्या भूमिकेबद्दल देखील अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सिनेमामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धनश्रीच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे.
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचं लग्न…
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2020 मध्ये दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2025 मध्ये युजवेंद्र आणि धनश्री यांचा घटस्फोट झाला.
युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांचं रिलेशनशिप
घटस्फोटानंतर धनश्रीने तिच्या करीयरकडे लक्ष केंद्रित केलं आहे. तर युजवेंद्र याच्या नावाची चर्चा आरजे महवश हिच्यासोबत रंगत आहे. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List