‘फक्त पैशांसाठी म्हाताऱ्यासोबत लग्न केलंय…’, अनेकांना जुहीला मारले टोमणे, पण सत्य फार भावुक करणारं
Juhi Chawla Love Life: अभिनेत्री जुही चावला हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज जुही मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. करीयरच्या शिखरावर असताना जुहीने पाच वर्ष मोठे उद्योजक जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं. सुरुवातील जुहीने स्वतःचं लग्न गुपित ठेवलं.
लग्नाची अधिकृत घोषणा केल्यानंतर करीयर संपेल अशी भीती जुहीच्या मनात होती. पण जेव्हा जुही चावलाच्या लग्नाची बातमी सर्वांना कळली तेव्हा अभिनेत्रीला अनेकांनी ट्रोल केलं. फक्त पैशांसाठी म्हाताऱ्यासोबत लग्न केलं… असं देखील अनेक जण अभिनेत्रीला म्हणाले. पण यावर जुहीने कधीच वक्तव्य केलं नाही.
जुही आणि जय मेहता यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 1995 मध्ये दोघांनी लग्न केलं. जुही चावला ही जय मेहता यांची दुसरी पत्नी आहे. रिपोर्टनुसार, जय मेहता यांच्या पहिल्या पत्नीचं नाव सुजाता बिर्ला असं होतं. सुजाता यांचं विमान अपघातात निधन झालं. तर काही दिवसांनंतर जुहीच्या आईने अखेरचा श्वास घेतला.
जुही आणि जय मेहता यांच्या आयुष्यातून महत्त्वाच्या व्यक्ती निघून गेल्यामुळे दोघांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या कठीण काळात जुही आणि जय मेहता यांनी एकमेकांची साथ दिली. अनेक वर्ष मित्र म्हणून राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
जय यांच्यासोबत लग्न केल्यामुळे जुहीला अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या. अनेकांनी तिची खिल्लीही उडवली. लोकांनी जुहीबद्दल वाईट कमेंट्स केल्या आणि तिच्या पतीला म्हाताराही म्हटलं. जुहीने पैशासाठी लग्न केल्याचंही लोकांनी म्हटलं…
लग्नानंतर जूहीने मुलगी आणि मुलाला जन्म दिला. जुही आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कामय सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर जुहीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List