गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेवगाव पोलिसांची कारवाई; आठ आरोपी गजाआड

गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेवगाव पोलिसांची कारवाई; आठ आरोपी गजाआड

शेवगाव पोलिसांनी दोन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे, चार मॅगझिन, दोन स्कॉर्पिओ गाड्या व 11 मोबाईल असा एकूण 13 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच याप्रकरणी आठ आरोपींना गजाआड केले आहे.

अंकुश महादेव धोत्रे (वय – 24, रा. बोरगाव, ता. जि. अहिल्यानगर), शेख आकिब जलील (वय – 27, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर), सुलतान अहमद शेख (वय – 47, रा. गोविंदपुरा अहिल्यानगर), दीपक गायकवाड (वय – 25, रा. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर), मुक्तार सय्यद सिकंदर (वय – 40, रा. अहिल्यानगर), पापाभाई बागवान (वय- 27, रा. वेस्टर्न सिटी, श्रीरामपूर), सोहेल कुरेशी (वय – 22, रा. फातेमा हाऊसिंग सोसायटी, श्रीरामपूर), आवेज शेख (वय – 28, रा. मिल्लतनगर, श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

श्रीरामपूर पोलिसांना काही इसम गावठी कट्टा व काडतूस जवळ बाळगून दोन चारचाकी वाहनांतून प्रवास करीत असल्याची माहिती श्रीरामपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली होती. या तपासणीवेळी दोन स्कार्पिओ पैठण ते शेवगाव या रोडने क्रांती चौक या ठिकाणी येत असताना ही वाहने अडवली. या वाहनांपैकी एम.एच. 16 एबी 5454 या वाहनांमध्ये एकूण पाच इसम मिळून आले.

या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चालकाच्या सीटच्या समोरील ड्राव्हरमध्ये एक गावठी कट्टा, दोन मॅग्झिन व चार जिवंत काडतुसे मिळून आली, तर एम. एच. 17 ए 4199 या वाहनांमध्ये तीन इसम मिळून आले. या हॅण्डबॅग मिळून आली. त्यामध्ये एक गावठी कट्टा, दोन मॅगझिन व 4 जिवंत काडतुसे मिळून आली. या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे, चार मॅगझिन, दोन स्कॉर्पिओ गाड्या व 11 मोबाईल असा एकूण 13 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच दोन्ही वाहनांमधील आठ जणांना गजाआड केले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सुंदरडे, काटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकात कुसारे, आबासाहेब गोरे, किशोर काळे, आदिनाथ वामन, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, भगवान सानप, राहुल खेडकर, संपत खेडकर, राहुल आठरे, प्रशांत आंधळे, एकनाथ गरकळ, चालक पोलीस नाईक घायतडक, होमगार्ड अमोल काळे, शिदें, रवी बोधले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांच्या पथकाने केली. सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे तपास करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement