‘ज्यांची मतं दिसली त्यांचेही आभार अन्, ज्यांची…’, राज ठाकरेंचा ईव्हीएमवरून पुन्हा हल्लाबोल

‘ज्यांची मतं दिसली त्यांचेही आभार अन्, ज्यांची…’, राज ठाकरेंचा ईव्हीएमवरून पुन्हा हल्लाबोल

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून पुन्हा एकदा ईव्हीएमवरून जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी खोचक टोला लगावला आहे. ‘काही जण म्हणतात हरलेला पक्ष. झालं निवडणुका संपल्या. सर्व गोष्टी झाल्या. गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून मनसेला मत दिली, ज्यांची मतं दिसली त्या सर्वांचे मी आभार मानतो. ज्या मतदारांनी मनसेला मतदान करूनही ईव्हीएम मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाही, त्यांचेही आभार मानतो. निवडणुका कशा झाल्या. काय काय गोष्टी झाल्या. यावर मी बोललो. जे झालं ते झालं. आता पुढे बघायचं, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

चौफेर फटकेबाजी?  

दरम्यान गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. मला बरंच बोलायचं आहे. निवडणुका झाल्यावर अनेक विषय झाले. अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे अनेक फोनही आले. नेमके आजच मला फोन आले. आज का आले याचे अर्थ मला समजतो. जरा जपून, असा खोचक टोला यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या, त्यातील काही गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभ मेळा. मी त्या दिवशी म्हटल्यानुसार, बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं. मी त्यांना म्हटलं पिणार नाही. मग नव्याने वारं शिरलेल्यां हिंदुत्वाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला.

आमचे नयन कदम जाऊन आले. आत गेल्यावर हा हा असं झालं म्हणे. हं हं नाही खालून प्रेत गेलं असेल एखादं असं मी त्यांना म्हटलं. आपल्या देशात नद्यांची भीषण अवस्था आहे,  ज्यांना आपण माता म्हणतो, ज्यांना आपन देवी म्हणतो त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं आहे. गंगा साफ झाली पाहिजे असं म्हणणारे पहिले व्यक्ती म्हणजे राजीव गांधी, पंतप्रधान झाल्यावर त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं. तेव्हापासून  आपन गंगाच साफ करत आहोत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चीनचा अमेरिकेला मोठा धक्का, बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास केला नकार; होणार मोठे नुकसान चीनचा अमेरिकेला मोठा धक्का, बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास केला नकार; होणार मोठे नुकसान
चीनने आपल्या विमान कंपन्यांना अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगकडून नवीन विमाने न घेण्याचे आदेश दिले आहेत. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, चीनने अमेरिकेत...
मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ, नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य
KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय
वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड, MCA चा मोठा निर्णय
Photo – नाशकात भगवे वादळ! शिवसेनेच्या निर्धार शिबीरासाठी नाशिक सज्ज