दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचे गंभीर आरोप; आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…
दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आल्यानं राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. आज भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी देखील नारायण राणे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
‘ माझं तेच काम आहे, यांना उत्तर द्यायचं नाही, कारण यांना पगारच इतरांवर घाण आरोप करायचा मिळतो. आपण आधी पाहिलं असेल माझ्या परिवारावर असेल माझ्या वडिलांवर असेल, माझ्या पक्षावर असेल, त्यांनी आरोप केले. त्यांना पक्ष सोडून किती वर्ष झाली मात्र त्यांच्या मनातून आम्ही काय उतरत नाही. बोलू द्या त्यांना. पक्ष सोडल्यापासून ते आमच्यावर टीका करतात. पण कचऱ्यावर आपण लक्ष देत नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज मी एक पत्र लिहिलं आहे. मी मुखमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, हे पत्र खूप महत्त्वाचं आहे. रस्त्यांच्या कामात झालेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी मुंबईतील सगळ्याच आमदारांची आहे. 15 जानेवारी 2023 ला पत्रकार परिषद घेऊन मी ज्या घोटाळ्याला समोर आणलं होतं, त्याच्याची चर्चा आता सुरू आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंनी नेमकं काय म्हटलं होतं?
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा आपल्याला दोनदा फोन आल्याचा त्यांनी दावा केला आहे. सतीश सालियन यांच्यावर दबाव होता. घरी पेडणेकर ताई जायच्या. आणि इतर लोक जायचे. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. ते दु;खात होते. त्यावेळी त्यांना पोलीस मदत करत नव्हते. आरोग्य विभाग मदत करत नव्हता असा आरोपही यावेळी राणे यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List