कोणाचा फोन आल्यावर तुला ताण येतो? असा प्रश्न विचारताच अभिषेकने थेट घेतलं ऐश्वर्याचं नाव
बॉलिवूडची लोकप्रिय जोडी अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा जरी आता शांत झाल्या असतील तरी त्यांच्याबद्दलच्या काहीना काही बातम्या समोर येतच असतात. आताही सोशल मीडियावर या जोडीची चर्चा होताना दिसतेय पण ती अभिषेकमुळे. एका कार्यक्रमात अभिषेकने ऐश्वर्याबद्दल जे काही विधान केलं त्यामुळे आता चर्चा होऊ लागली आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
अभिषेक बच्चनला आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटातील अभिनयासाठी एका पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पण, या पुरस्कार सोहळ्यात अभिषेक आणि अर्जुन कपूर यांच्यातील मजेदार संवाद तेवढाच रंजक राहिला. सर्वच सेलिब्रिटींनी तो एन्जॉय केला. पण त्या संवादादरम्यान अभिषेक ऐश्वर्याबद्दल असं काही बोलून गेला की सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
“कोणत्या व्यक्तीच्या फोनमुळे ताण येतो?”
पुरस्कार मिळाल्यावर अर्जुन कपूरने गमतीने अभिषेक बच्चनला प्रश्न विचारला. ‘अशी कोणती व्यक्ती आहे जी फोन केल्यावर म्हणते की अभिषेक, मला तुझ्याशी बोलायचं आहे’ आणि ते ऐकून तुला ताण येतो,” असा प्रश्न अर्जुन कपूरने विचारल्यावर अभिषेक बच्चनने जे उत्तर दिलं ते फारच विचार करायला लावणारं होतं. अर्जुन कपूरच्या प्रश्नावर अभिषेक बच्चन म्हणाला, “तुझं अजून लग्न झालेलं नाही, जेव्हा तू लग्न करशील तेव्हा तुला सर्व उत्तरं मिळतील” अभिषेकचं बोलणं ऐकून प्रेक्षकही हसू लागतात.
“जेव्हा तुम्हाला तुमच्या बायकोचा फोन येतो…”
अर्जुन कपूरच्या प्रश्नावर अभिषेक बच्चन पुढे मिश्किलपणे म्हणतो, “जेव्हा तुम्हाला तुमच्या बायकोचा फोन येतो आणि ती म्हणते, ‘मला तुझ्याशी बोलायचं आहे’, तेव्हा तुम्ही समजून जा की तुम्ही अडचणीत आहात”. याचा अर्थ अभिषेक बच्चनने ऐश्वर्याबद्दल असं थेट कदाचित पहिल्यांदाच बोलल्यामुळे सगळ्यांसाठीच हे उत्तर अनपेक्षित होतं. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला आता 17 वर्षे पूर्ण झाली आहेत.
पुरस्कार मिळाल्यानंतर सर्वांचे आभार मानले
अभिषेक बच्चन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिषेकने चित्रपटाचे दिग्दर्शक शूजित सरकार, त्याचे सहकलाकार आणि क्रू यांचे आभार मानले. तेव्हा तो म्हणाला, ‘हा माझा पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आहे. मी ज्युरींचे आभार मानू इच्छितो. तुम्ही मला या पुरस्कारासाठी पात्र समजलंत, ही माझ्यासाठी मोठी सन्मानाची गोष्ट आहे. पण याचे श्रेय पूर्णपणे शूजित (सरकार) यांना जातं. त्यांनी इतका अप्रतिम चित्रपट तयार केला आहे. मी माझ्या अहिल्या व पर्लबरोबर हा पुरस्कार शेअर करू इच्छितो. त्यांनी या चित्रपटात खूप छान काम केलं आहे.हा पुरस्कार माझे सहकारी अभिनेते आणि निर्मात्यांचा देखील आहे. मी तुमचा सर्वांचा आदर करतो. कृपया तुम्ही जे करता ते करत रहा.” असं म्हणत त्याने सर्वांचे आभार मानले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List