Prajakta Mali च्या आयुष्यात घडली अत्यंत महत्त्वाची गोष्ट, स्वतःच पोस्ट करत म्हणाली…
Prajakta Mali Social Media Post: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या प्राजक्ता नुकताच ‘फुलवंती’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमात अभिनेत्रीने मुख्य भूमिका तर साकारलीच, पण अभिनेत्रीने ‘फुलवंती’ सिनेमातून निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केलं.
‘फुलवंती’ सिनेमातून प्राजक्ताने केलेला नवीन प्रयत्न यशस्वी ठरला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. प्राजक्ताच्या ‘फुलवंती’ सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. दरम्यान प्राजक्ताच्या निर्माती म्हणून पहिल्या प्रयत्नाला पुरस्कार देखील मिळाला आहे.
महत्त्वाचं म्हणजे, प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाला एक – दोन नाही तर, तब्बल सहा पुरस्कार मिळाले आहेत. एक खास पोस्ट शेअर करत तिनं हा आनंद व्यक्त केलाय. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
अभिनेत्रीने स्वतःचा पुरस्कारासोबत एक व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये आनंद व्यक्त केला आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्री म्हणाली, ‘फुलवंतीच्या आयूष्यातील क्षण आणखी फुलायला लागले…, काल पार पडलेल्या “झी चित्र गौरव २०२५” कार्यक्रमात फुलवंतीला ६ पारितोषिकं मिळाली.
१- प्राजक्ता माळी- The most Natural Performance Of the Year.
२- महेश लिमये- सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (Cinematographer)
३- वैशाली माढे – सर्वोत्कृष्ट गायिका
४- उमेश जाधव – सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन
५- मानसी अत्तरदे – सर्वेश वेशभूषा
६- महेश बराटे – सर्वोत्कृष्ट रंगभूषा
खरे तर “फुलवंती” मध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांचाच हा गौरव आहे. सगळ्यांचेच मनापासून आभार.’ सध्या अभिनेत्री पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते अभिनेत्रीवर लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
प्राजक्ता कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List