सरकारवर निशाणा साधत प्रसिद्ध गायक म्हणाला, ‘आपली अशिक्षित जनता…’, काय आहे प्रकरण?

सरकारवर निशाणा साधत प्रसिद्ध गायक म्हणाला, ‘आपली अशिक्षित जनता…’, काय आहे प्रकरण?

Vishal Dadlani And Samay Raina: काही सेलिब्रिटी कायम त्यांच्या सडेतोड वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे गायक विशाल ददलानी. विशाल कायम त्याला पटणाऱ्या गोष्टींचं समर्थन करताना दिसतो आणि खटकणाऱ्या गोष्टींवर व्यक्त होताता दिसतो. आता देखील असंच काही झालं आहे. सध्या सोशल मीडियावर समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांच्यामुळे चांगलाच वाद रंगला आहे. आता यामध्ये विशाल याने देखील उडी घेतली आहे. विशाल याने समय आणि रणवीर यांची बाजू घेत सरकार आणि महाकुंभवर निशाणा साधला आहे.

विशाल ददलानी याने सोशल मीडिया इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये विशाल याने समय याचं समर्थन केलं आहे. विशाल पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘हा सर्व पाखंडीपणा आहे. सरकारला ऑनलाईव कंटेंटवर नियंत्रण मिळवायचं आहे. बऱ्याच दिवसांपासून सरकार असं करण्याच्या प्रयत्नात आहे… आता टीव्हीच्या मदतीने लोकांमध्ये रोष वाढवण्याचा प्रयत्न होत आहे, त्या लाटेत आपली निराजस आणि अशिक्षित जनता त्यांचं स्वतःचं स्वातंत्र्य गमावत आहे… उल्लेख करायचा नाही पण… महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीत झालेल्या मृतांचं काय? कळलं?’ अशी पोस्ट गायकाने केली आहे.

काय आहे प्रकरण?

‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने आई वडिलांबद्दल एका वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रणवीर याने केलेल्या अश्लिल वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चांगलंच वातावरण तापलं होतं. याप्रकरणी रणवीर, समय यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता यावर पोलीस कसून चौकशी करत आहेत.

आई – वडिलांना केलेल्या वक्तव्यानंतर रणवीर आणि समय यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. शोचे व्हिडीओ देखील युट्यूबने डिलिट केले आहेत. दरम्यान, रणवीर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी देखील मागितली. प्रकरण वादाच्या भोवऱ्यात असताना रणवीर याला जीवे मारण्याच्या धमक्या देखील येत आहेत.

विशाल ददलानी याचा अपघात

काही दिवसांपूर्वी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी विशाल ददलानी याचा अपघात झाला होता. ज्यामुळे अभिनेत्याचे शो देखील रद्द करावे लागले होते. विशालच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. पण त्याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. स्वतः विशाल याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघाताची माहिती दिल्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली.

इन्स्टाग्राम स्टोरीवर विशाल ददलानी याने एका पोस्ट शेअर करत अपघाताची माहिती दिली. ‘मझा लहान अपघात झाला आहे. मी लवकरच परत येईल… मी तुम्हाला सर्वांना अपडेट देत राहिल…’ असं गायक म्हणाला. विशाल कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kolhapur News – पन्हाळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळला साप Kolhapur News – पन्हाळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळला साप
ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर “पन्हाळगडचा रणसंग्राम, पन्हाळ गडावरून सुटका” लघुपट व 13 डी थिएटरचा शुभारंभ सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
Santosh Deshmukh Case – अशी वेळ इतर कुणावरही येऊ नये, यात कुणाचा हात आहे त्याला शिक्षा दिली पाहिजे, वैभवी देशमुखची सरकारकडे मागणी
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ
IPS अधिकाऱ्याची सावत्र मुलगी अन् अभिनेत्री सोन्याच्या तस्करीत, 13 कोटींचे सोने जप्त, बॉलीवूड स्टाईलने तस्करी
राज्यातील 58, 394 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, अजूनही मिळाले नाही अनुदान
राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती…
Video – मुंबईने सर्वधर्मीयांच्या पोटाची काळजी घेतली – भास्कर जाधव