रवीना टंडनने तिचे सोन्याचे कानातले काढून थेट पापाराझीला गिफ्ट म्हणून दिले; लेक पाहतच राहिली
बॉलिवूडमधील सेलिब्रिटी बऱ्याचदा त्यांच्या कृतीने चाहत्यांची मनं जिंकून घेतात. असंच काही केलं आहे बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडने. रवीनाच्या एका कृतीने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. ती चेहऱ्याने जेवढी सुंदर आहे तेवढंच सौंदर्य हे तिच्या मनाचंही आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे तिची ही कृती होती. रवीनाने पापाराझीला थेट तिच्या सोन्याचे कानातले काढून दिले. ही कृती सर्वांसाठीच आश्चर्यकारक होती.
रवीना अन् तिची मुलगी विमानतळावर स्पॉट
रवीना टंडनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रवीना तिची मुलगी राशासोबत विमानतळावर दिसत आहे. आई आणि मुलगी दोघेही विमानतळावर पोहोचताच तेव्हा पापाराझी त्यांना पोज देण्यासाठी थांबवतात. पापाराझी त्या दोघांचेही फोटो आधी क्लिक करतात. तेव्हा रवीना पापाराझी यांच्यात काहीतरी संवाद होतो. तेव्हा रवीना त्याला विचारताना दिसते की कोणतं, वरच का? तेव्हा पापाराझी उत्तर देत हो म्हणतो.
रवीना अचानक तिच्या कानातील सोन्याची बाली काढते अन्…
यानंतर, रवीना अचानक तिच्या कानातील सोन्याची बाली काढते आणि कोणताही विचार न करता ते थेट पापाराझीच्या हातात देते आणि पुढे जाते. जेव्हा ती अभिनेत्री असं करते तेव्हा तिथे उभे असलेल्या सर्वांनाच धक्का बसतो, त्या पापाराझीलाही विश्वास बसत नाही. एवढंच नाही तर तिच्या मागे उभी असलेली तिची मुलगी राशाही तिच्याकडे फक्त पाहत राहते. पण, ती काहीही बोलत नाही आणि शांतपणे तिच्या आईसोबत निघून जाते. रवीनाची ही कृती तिच्या चाहत्यांची मन जिंकणारी होती. रवीनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरू कमेंट्स केल्या आहेत.
रवीनाच्या कृतीने चाहते खूश
एका युजरने कमेंट केली आहे की, ‘बडे दिलवाली है यो तो.’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “जेव्हा तुमचे संगोपन चांगले असते तेव्हा हे….” अनेकांनी कमेंट करून रवीनाचं कौतुक करत दयाळू आणि मोठ्या मनाची असल्याचं म्हटलं आहे. रवीना टंडनने तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. रवीना टंडन ही 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
52 वर्षीय रवीना टंडन अजूनही फिटनेसच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना मागे टाकते. रवीना अजूनही चित्रपटांमध्ये सतत सक्रिय आहे. त्यांचे अनेक चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित झाले आहेत. आणि लवकरच ती अक्षय कुमारच्या मल्टीस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ मध्येही दिसणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List