शिवजयंतीला ‘छावा’ सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, 10 – 20 नाही इतक्या कोटींची कमाई

शिवजयंतीला ‘छावा’ सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, 10 –  20 नाही इतक्या कोटींची कमाई

Chhaava Box Office: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला दिसत आहे. सिनेमा 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला असून तुफान कमाई करताना दिसत आहे. ‘छावा’ सिनेमा विकी, रश्मिका आणि इतर कलाकारांसाठी फार महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारताना दिसत आहे. पण शिवजयंतीला प्रेक्षकांनी ‘छावा’ सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं. सिनेमाने सहाव्या दिवशी म्हणजे शिवजयंतीला बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडलं आहेत.

सांगायचं झालं तर, सोमवारी ‘छावा’ सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावताना दिसला. पण मंगळवारी ‘छावा’ सिनेमाने कमाईने विक्रम रचलं आहे. कमाईचा आकडा पाहून विश्लेषक देखील चकित झाले आहे. ‘छावा’ सिनेमाने हीट सिनेमे ‘जवान’, ‘पठाण’, ‘पुष्पा’ यांसारख्या सिनेमांना देखील सहा दिवसांच्या कमाईत मागे टाकलं.

शिवजयंती असल्यामुळे अनेक चाहत्यांनी ‘छावा’ सिनेमा पाहण्याचं ठरवलं आणि सर्व थिएटर हाऊसफूल झाली. स‌ॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘छावा’ सिनेमाच्या पहिल्या दिवसाची कमाई 31 कोटी होती. त्यानंतर कमाई वेग मंदावला. पण शिवजंयतीला सिनेमाच्या कमाईचा ग्राफ चढत्या क्रमावर राहिला…

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 

मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी 31कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 37 कोटी रुपयांचा कमाई केली. तिसऱ्या सिनेमाने 48.5 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली… तर चौथ्या आणि पाचव्या दिवशी सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावताना दिसला. चौथ्या दिवशी सिनेमाने 24 कोटी रुपये, तर पाचव्या दिवशी 25.25 रुपयांचा गल्ला जमा केला.

चौथ्या आणि पाचव्या दिवशी कमाईचा वेग मंदावल्यानंतर चाहत्यांना आणि निर्मात्यांना मोठा धक्का बसला. पण शिवजयंतीला सिनेमाने 10 – 20 कोटी नाही तर, तब्बल 32 कोटी रुपयांची कमाई केली. सांगायचं झालं तर, शिवजयंतीला प्रेक्षकांनी ‘छावा’ सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं.

सिनेमा सहा दिवसांत तब्बल 197.75 कोटींची कमाई केली आहे. सिनेमा लवकरच 200 कोटी रुपयांचा गल्ला पार करेल… अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘छावा’ ज्या वेगाने प्रगती करत आहे, ते पाहता लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महिला दिनानिमित्त एमपॉवरचा धक्कादायक अहवाल, मुंबईकर महिला ‘या’ कारणामुळे तणावग्रस्त महिला दिनानिमित्त एमपॉवरचा धक्कादायक अहवाल, मुंबईकर महिला ‘या’ कारणामुळे तणावग्रस्त
महिलांचे मानसिक आरोग्य गंभीर संकटात आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीनुसार, भारतात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ३६.६ टक्के आहे....
संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहिल्यानंतर लेक पहिल्यांदाच बोलली…, तुम्हालाही अश्रू नाही आवरणार
सरकारी रुग्णवाहिकेसाठी फोन केला, सहा तासांत रुग्णवाहिका आली नाही…रुग्णाने सोडले प्राण
बेघर मुंबईकरांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, मिळणार हक्काचं घर!
Video: तुम्ही निघा!; अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना सर्वांसमोर स्टेजवरून उतरवले खाली
जयकुमार गोरेने मला दंडवत घातला म्हणून चांगुलपणाच्या भावनेतून केस मागे घेतली, पण आता…; पीडित महिलेचा इशारा
TB रुग्णांसाठी Meropenem इंजेक्शन महानगरपालिका, सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत द्यावीत, सुनील प्रभू यांची मागणी