अँड दि ऑस्कर गोज टू…या १० चित्रपटांना नामांकन,केव्हा आणि कुठे पाहायचा सोहळा
हॉलीवूडचा ऑस्कर पुरस्कार सोहळा – २०२५ साजरा होत आहे. जगभरातील सिनेमाप्रेमींच लक्ष या अवॉर्ड फंक्शनवर लागली आहे. साल २०२५ मध्ये ९६ वा ऑस्कर सोहळा साजरा केला जात आहे. प्रत्येक कॅटगरीतील नामांकनाची यादी जाहीर झाली आहे. आता घटिका समिप आली असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कष्ट गीत, सर्वौत्कृष्ट संगीत यासाठी कोणत्या कलाकारांना निवडले आहे हे पाहूयात…
कोणते चित्रपट नॉमिनेट झाले ?
साल २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या वर्गवारीत १० चित्रपटांना नॉमिनेट केले आहे.यात काही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर देखील स्वत:ला सिद्ध केले आहे. तर आता जगातील सर्वश्रेष्ट पुरस्कार मिळण्याच्या शर्यतीत कोणते चित्रपट पोहचलेत ते पाहूयात. चला तर पाहूयात कोणता चित्रपट कोणी डायरेक्ट केला आहे.
अ कम्प्लीट अननोन –
हा साल २०२४ मध्ये आलेला म्युझिक ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स मेनगोल्ड यांनी केले आहे. या चित्रपट सिनेमागृहात एव्हरेज चालला. आता या चित्रपटाची ज्युरींनी ऑस्करकरीता निवड केली आहे.
अनोरा –
या चित्रपटाचे ऑस्करसाठी नामांकन झाले असून हा चित्रपट ऑक्टोबर २०२४ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सीन बेकर यांनी केले आहे. या चित्रपटात मिकी मेडिसन यांनी लीडचा रोल केला आहे.चित्रपटाला २०२५ मध्ये ऑस्करच्या सहा विविध कॅटगरीत नॉमिनेट केले आहे. त्यात बेस्ट फिल्म या कॅटेगरीचाही समावेश आहे.या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे बजेटपेक्षा ७ पट कमाई केली आहे.
आय एम स्टील हेअर –
वॉल्टर सालेस यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक पॉलिटिकल बायोग्राफिल ड्रामा फिल्म होती, जिने तीन पट कमाई केली आहे. या चित्रपटाची एक खास बाब म्हणजे ब्राझीलियन सिनेमाद्वारे प्रोड्युस झालेला हा पहिला चित्रपट आहे, ज्याला ऑस्करच्या या कॅटगरीत नॉमिनेट केले आहे.
ड्यून पार्ट 2 –
ही फिल्म भारतीय प्रेक्षकांना आवडला आहे. याचे दिग्दर्शन डेनिस व्हीलेनयुव्ह यांनी केले आहे. ही फिल्म सुमारे १६०० कोटीच्या बजेटमधून तयार केली होती. आणि ६२०० कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.
कॉन्क्लेव –
या चित्रपटाचे दिग्दर्शन एडवर्ड बर्गर यांनी केले आहे. या चित्रपटात राल्फ फिनेस यांनी मुख्य रोल केला आहे. २० मिलियन डॉलरमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने १०० मिलियन डॉलरहून जादा कमाई केली आहे.आता ती विनरच्या रेसमध्ये आहे.
इमीलिया परेज –
ही एक म्युझिकल क्राईम फिल्म आहे. या फिल्मचे दिग्दर्शन जॅक्स ऑडियर्ड यांनी केले आहे. या चित्रपटाचा कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रीमीयर झाला होता. या सोहळ्यात या चित्रपटाचा सन्मान झाला होता. ही एक म्युझिकल क्राईम फिल्म असली तर बॉक्स ऑफीसवर जास्त चालली नाही.आता ऑस्करमध्ये मात्र या चित्रपटाला सर्वाधिक १३ नॉमिनेशन्स मिळाले आहेत.ज्यात बेस्ट फिचर फिल्म्सचे नामांकन देखील आहे.
द सबस्टन्स –
हा एक हॉरर सायन्स-फिक्शन चित्रपट आहे. याचे दिग्दर्शक कोरली फारगेट आहेत आणि डेमी मोरे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला आणि चार पट जास्त कमाई करण्यात यशस्वी झाला. आता हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतही एक प्रबळ दावेदार मानला जात आहे. या चित्रपटाला ५ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे.
निकेल बॉईज –
ऑगस्ट २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रामेल रोज यांनी केले होते. ऑस्कर व्यतिरिक्त, या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल झाला होता. आता हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आपले नशीब आजमावत आहे.
विक्ड –
हा एक म्यूझिकल-फँटसी चित्रपट आहे, ज्यामध्ये सिंथिया एरिव्हो याने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाने ६,३५० कोटी रुपये कमावले आणि वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही त्याचा समावेश होता.
द ब्रुटालिस्ट –
हा ब्रॅडी कॉर्बेट दिग्दर्शित एक ऐतिहासिक ड्रामा आहे. या चित्रपटात एड्रियन ब्रॉडी याने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने त्याच्या बजेटपेक्षा ४ पट जास्त कमाई केली असून तो सुपरहिट ठरला आहे. आता या चित्रपटाने ऑस्कर चित्रपटांच्या सर्वोत्तम श्रेणीत आपले स्थान निर्माण केले आहे.
ऑस्कर सोहळा कधी आणि कुठे पाहायचा?
ऑस्कर पुरस्कार सोहळा २०२५ हा सोमवार, ३ मार्च २०२५ रोजी लाईव्ह पाहाता येईल. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटर तो होत आहे.तुम्हाला तो OTT वर हा सोहळा पहायचा असेल तर ते भारतीय वेळेनुसार सकाळी ५:३० वाजता पाहता येईल. जिओ हॉटस्टारवर ओटीटीवर ऑस्कर सोहळा प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्टार मुव्हीज आणि स्टार मुव्हीज सिलेक्टवर देखील हा सोहळा पाहू शकता.
पुन:र्प्रसारण कुठे पाहू शकता?
काही कारणास्तव तुम्हाला ऑस्कर सोहळा पाहाता आला नाही तर त्याचे पुन:र्प्रसारण रात्री ८:३० वाजता पाहू शकता. कोनन ओ’ब्रायन यांना पहिल्यांदाच अकादमी पुरस्कारांमध्ये होस्टची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. या शोमध्ये डेव्ह बॉटिस्टा, हॅरिसन फोर्ड, गॅल गॅडोट, सॅम्युअल एल. जॅक्सन, मार्गारेट क्वाली, राहेल झेगलर आणि अँड्र्यू गारफिल्ड हे सादरकर्ते म्हणून असतील.
भारताकडून काय अपेक्षा ?
भारताबद्दल बोलयाचे झाले तर, यावेळीही चित्रपट निर्माते गुनीत मोंगा यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेला ‘अनुजा’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट लघुपटाच्या यादीत नामांकित झाला आहे. याआधी, गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या चित्रपटाने ऑस्कर जिंकले होते आणि भारताला पहिला ऑस्कर सन्मान मिळवून दिला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List