तुझं रक्त प्यायला मजा येईल, संपत्तीसाठी मुलीची आईला धमकी; मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
मी तुझं रक्त पिऊन टाकेन, तुला मारून तुझं रक्त प्यायला मजा येईल; अशी धमकीच एका मुलीने आपल्या आईला दिली. या मुलीचा आईला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ हरयाणातील हिसारचा असून पोलिसांनी या प्रकरणी मुलीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
हिसारमधील आझाद नगरमधी ल मॉर्डन साकेत कॉलनीत राहणाऱ्या रीटा या महिलेचा तिची आई निर्मला देवीला मारहाण करतानाचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रीटा आपल्या आईला बेदम मारहाण करताना दिसत आहे. ती तिच्या आईला चावताना दिसत आहे. शिविगाळ करत आहे. रिटाच्या या निदर्यीपणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील हेलावले आहेत.
दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रीटाचा भाऊ अमरदीप सिंग याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, रीटाने दोन वर्षांपूर्वी राजगडमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत लग्न केले होते. मात्र लग्नानंतर लगेच ती माहेरी परतली. काही दिवसांनी तिचा नवरा देखील तिथेच राहायला आला. त्यांनी प्रॉपर्टीसाठी निर्मला देवींवर दबाव आणायला सुरुवात केली. त्यांच्या दबावामुळे निर्मला देवींनी 65 लाखांची एक प्रॉपर्टी विकली. मात्र तेवढ्यावर रीटाची हाव थांबली नाही. तिने पुन्हा एकदा आईवर इतर प्रॉपर्टीसाठी दबाव टाकायला सुरुवात केली.
अमरदीपने त्याला विरोध केला तेव्हा खोट्या आरोपात अडकवण्याची धमकी दिली. त्यामुळे अमरदीप देखील तिला घाबरत होता. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमरदीपने पोलिसांत तक्रार दाखल केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List