भाजपने बोगस मतदार घुसवून महाराष्ट्र – दिल्लीची निवडणूक जिंकली, ममता बॅनर्जी यांचा आरोप
निवडणूक आयोगाबद्दल मला आदर होता, पण आता असे दिसते की तो भाजपच्या विचारांच्या लोकांनी भरलेला आहे. नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे अमित शहांच्या खात्यात होते.
भाजपने निवडणूक आयोगाच्या मतदतीने महाराष्ट्र आणि दिल्लीच्या मतदार यादीत बोगस मतदार घुसवले. त्या माध्यमातूनच भाजपने या दोन राज्यांतील निवडणुका जिंकल्याचा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.
पश्चिम बंगालमध्येही मतदार यादीत नावे घुसवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. गुजरात आणि हरयाणातील लोकांची बोगस नावे मतदार यादीत घुसविण्यात येत आहेत. हे थांबले नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करेन, असा इशारा ममता यांनी दिला. मतदार याद्यांच्या पडताळणीवर देखरेख ठेवण्यासाठी तृणमूल कॉँग्रेसने उच्चस्तरीय समिती स्थापन केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List