स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरण, एसटी अधिकाऱ्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश काय

स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरण, एसटी अधिकाऱ्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश काय

पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात एका महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख ( सहाय्यक वाहतूक अधिक्षक ) आणि आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे असे आदेश उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ( प्रभारी ) विवेक भीमनराव यांना दिले आहेत. तसेच एकूणच महिला प्रवाशांच्या सुरक्षे संदर्भात आढावा घेण्यासाठी  एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भातील बैठक उद्या सकाळी 12:30 वाजता मंत्रालयामध्ये बोलावली आहे.

मंगळवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बस मध्ये एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या घटनेची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित बसस्थानकावरील त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची या प्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षा संदर्भात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी, त्या चौकशीमध्ये ते दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे असेही आदेश दिले आहेत. तसेच या बसस्थांनकावर कार्यरत असलेले सर्व सुरक्षा रक्षकांना तात्काळ बदलण्यात यावे, तसेच त्यांच्याऐवजी दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी असेही आदेश दिले आहेत. याबरोबरच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील ७ दिवसात आपणास सादर करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी ) विवेक भिमानवार यांना दिल्या आहेत.

जुन्या बसेसना हटविण्याचा मागणी

बसस्थानक परिसरातील जुन्या (scrap buses) बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अशा बसेसकडे दुर्लक्ष होत असल्याने या बसेस एक प्रकारे अवैध धंद्याचे अड्डे बनत आहेत. आणि त्यातून अशा घटनांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही बसस्थानक परिसरात अशा प्रकारच्या बंद पडलेल्या बसेस उभ्या करण्यात येऊ नये असे आदेश यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राखी सावंत बनणार पाकिस्तानची सून; ड्रामा क्वीनच्या हातात कोणी घातली अंगठी? राखी सावंत बनणार पाकिस्तानची सून; ड्रामा क्वीनच्या हातात कोणी घातली अंगठी?
फिल्म इंडस्ट्रीमध्ये राखी सावंतला ड्रामा क्वीन म्हटलं जातं. कारण कधी आणि कसं लाइमलाइटमध्ये यायचं हे तिला चांगलं माहीत आहे. आता...
शरीरात या 5 जागी दुखत असेल तर समजून जा, कॉलेस्ट्रॉल वाढलंय…
महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले सहा जण बुडाले
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते राजकारणातून हद्दपार होणार? केंद्र सरकारने मांडली सर्वोच्च न्यायालयात बाजू
स्वारगेट बलात्कार प्रकरणी शिवसेनेचा दणका, वसंत मोरेंच्या नेतृत्वात आंदोलन
स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरण, एसटी अधिकाऱ्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश काय
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन, अजितदादांसाठी डोकेदुखी ठरलेला ‘तो’ नेता करणार शिवसेनेत प्रवेश