मोठी बातमी! एसटीचा मोफत प्रवास बंद होणार? परिवहन मंत्र्यांकडून सर्वात मोठी अपडेट

मोठी बातमी! एसटीचा मोफत प्रवास बंद होणार? परिवहन मंत्र्यांकडून सर्वात मोठी अपडेट

महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटामध्ये अर्धी सूट देण्यात आली आहे, त्यामध्ये महिलांना अर्ध्या तिकिटाच्या दरात राज्यभरात कुठेही प्रवास करता येतो. त्यामुळे महिलांची एसटी प्रवासाला पसंती मिळत असून, एसटीचे प्रवासी वाढण्यास मदत झाली आहे, दुसरीकडे वय वर्ष 65 वर्षांवरील नागरिकांना देखील प्रवास दरात अर्धी सूट मिळते, तर ज्यांचं वय हे 75 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा स्त्री व पुरुषांना राज्यभरात कुठेही एसटीनं मोफत प्रवास करता येतो. तसेच विद्यार्थ्यांना देखील रोजच्या प्रवासासाठी एसटीकडून पासच्या स्वरुपात मोठी सवलत देण्यात येते. मात्र एसटी तोट्यात असल्यामुळे मोफत प्रवासाची योजना बंद होणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले सरनाईक 

एसटी बसला सर्वसामान्यांची लाईफलाईन म्हणून ओळखलं जातं. सुरक्षित आणि स्वस्त प्रवासासाठी प्रवासी एसटीलाच पसंती देतात. लांबच्या पल्ल्यासाठी एसटी बसच्या प्रवासाला पसंती दिली जाते. तसेच परिवहन विभागाने एसटीच्या माध्यमामथून प्रवाशांसाठी अनेक सोई उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र एसटी तोट्यात असल्यामुळे मोफत प्रवास बंद होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा खुलासा केला आहे. मोफत प्रवासाचा निर्णय बंद होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे, त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान डिजिटल बोर्ड लावण्यासंदर्भात देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे.   एसटीला विश्वासात घेतल्याशिवाय हे करणं चुकीचं आहे, एसटी महामंडळाला माहिती व जनसंपर्क विभागाने विश्वासात घेतलं नाही हे चुकीचं आहे. आम्ही यामाध्यमातून उत्पन्न वाढवतोय, मात्र आम्हाला माहिती व जनसंपर्क विभागाने विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. आमचा याला विरोध असून, आम्ही माहिती व जनसंपर्क विभागाला टेंडर प्रोसेस थांबवण्यास सांगितलं आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कर्नाटकात बसवर हल्ला झाला, चालकाला दमदाटी करण्यात आली, त्यानंतर आम्ही बसेस थांबवल्या आहेत. कोणी अस्मितेवर घाला घालत असेल तर हे चुकीचं आहे, असंही यावेळी सरनाईक यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्य सरकारी १७ लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ,पाहा काय झाला निर्णय राज्य सरकारी १७ लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ,पाहा काय झाला निर्णय
राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आली आहे....
जयंत पाटील बावनकुळेंना का भेटले? आतली बातमी समोर
मोठी बातमी! घोषणा देत तरुणाची मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी
‘त्यांचा घटस्फोट…’, मामा गोविंदाच्या डिव्होर्सवर कृष्णा अभिषेकने दिली प्रतिक्रिया
नागीन 7 : या पाच नायिका एकता कपूर यांच्या नव्या “नागीन” च्या शर्यतीत
37 वर्षांनी गोविंदा आणि सुनीताचा होणार ‘ग्रे डिव्होर्स?’ नक्की काय आहे संकल्पना वाचा
“देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नाही, दिशाभूल का करता?”; त्र्यंबकेश्वर येथे नृत्य करण्यास मनाई करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचं थेट उत्तर