अभिनेत्री लग्नानंतर 4 महिन्यांतच 2 मुलांची झाली आई, 50 सेकेंदात कमावले 5 कोटी, कोण आहे ‘ती’?
सध्या ज्या अभिनत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री आलिया भट्ट, दीपिका पादुकोन, कटरिना कैफ, समंथा किंवा रश्मिका असू शकते… असं तुम्हाला वाटत असेल. पण असं काहीही नाही. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आता दुसरीच कोणी आहे. अभिनेत्रीसोबत टाटा स्कायच्या जाहिरातीत काम करण्यासाठी संपर्क साधला होता. त्या जाहिरातीत काम करण्यासाठी तिला 50 सेकंदांसाठी 5 कोटी रुपये मानधन मिळालं होतं. आज अभिनेत्री कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगत आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे. तिचा हिंदी आणि साऊथ अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत तिचा दबदबा आहे. रजनीकांत, शाहरुख खान, जयराम, नागार्जुन अक्किनेनी यांच्यासोबत काम केलेल्या आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचं नाव फोर्ब्सच्या यादीत देखील सामिल आहे .
2018 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या ‘सेलिब्रिटी 100’ यादीत समाविष्ट केलेली ती एकमेव दक्षिण भारतीय महिला अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने 20 वर्षात 80 सिनेमांमध्ये काम केलं असून अनेक पुरस्कार पटकावले आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर नयनतारा आहे.
2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नौमुन राउडी थान’ सिनेमात काम करत असताना अभिनेत्रीची ओळख दिग्दर्शक विघ्नेश शिवनशी याच्यासोबत झाली. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. अखेर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तब्बल 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यांनंतर नयनतारा आणि विघ्नेश यांनी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचं जगात स्वागत केलं. यावर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. कारण भारतात सरोगसीवर बंदी आहे पण भारतात कायदा लागू होण्यापूर्वीच नयनताराने ही प्रक्रिया पूर्ण केली होती.
नयनतारा हिने 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. किंग खानसोबत स्क्रिन शेअर केल्यामुळे अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
रिपोर्टनुसार, नयनतारा एका सिनेमासाठी तब्बल 10 कोटी रुपये मानधन घेते. नयनतारा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List