लक्ष्मी यांचा दबाव, महामंडलेश्वर पदासाठी 2 लाखांची मागणी; ममता कुलकर्णीचे व्हिडीओद्वारे धक्कादायक खुलासे
चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. 90 च्या दशकात त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आणि लोकांच्या मनावर राज्य केले. प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ 2025 च्या सुरुवातीपासूनच अभिनेत्री ममता कुलकर्णी चर्चेत आहे. महाकुंभमेळ्यादरम्यान किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर ही पदवी दिली. मात्र त्यावरून बरेच वाद झाले.
महामंडलेश्वर पदाच्या राजीनाम्याबद्दल ममता कुलकर्णीची पहिली प्रतिक्रिया
अनेकांनी ममता कुलकर्णीला दिलेल्या महामंडलेश्वर पदाला प्रचंड विरोध करण्यात आला. वादानंतर, 7 दिवसांतच त्यांच्याकडून हे पद परत घेण्यात आलं असल्याचंही म्हटलं जातं. मात्र आता त्यावर ममता कुलकर्णीची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
ममता कुलकर्णीचा यासंदर्भातला एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिने या पदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. एवढच नाही तर तिने बरेच धक्कादायक खुलासेही केले आहेत. ममता कुलकर्णी नक्की काय म्हणाली आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात. “मला दिलेल्या महामंडलेश्वर पदाबद्दल अनेकांना आक्षेप आहे. मी, महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, या पदाचा राजीनामा देत आहे. मला दिलेला आदर माझ्या २५ वर्षांच्या तपश्चर्येसाठी होता, परंतु काही लोकांना मी महामंडलेश्वर असण्यावर आक्षेप आहे. अनेकांनी याबद्दल विरोध केला आहे. पण माझ्याकडे हे पद असलं नसलं तरी माझी काही हरकत नाहीये. कारण मी 25 वर्षे घोर तपश्चर्या केली आहे. माझ्या गुरुंच्या समोर बाकी कोणीच मोठं नाहीये.” असं बरंच काही म्हणत ममताने तिची नाराजी व्यक्त केली आहे.
महामंडलेश्वर पदासाठी 2 लाख मागितल्याचा खुलासा
एवढच नाही तर तिला या महामंडलेश्वर पदासाठी 2 लाख रुपये मागितले होते, त्यानंतरही पैशांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासाही ममताने या व्हिडीओमध्ये केला आहे. तसेच ” मी एक साध्वी असून, माझी तपश्चर्या, माझी ध्यानधारणा माझ्यासाठी पुरेशी आहे. जे कोणी माझ्याकडे ज्ञान मागयला येइल त्यांना मी नक्कीच ते देईल. तर मी हे सर्वांना स्पष्टपणे सांगतेय की मी या पदाचा राजीनामा देत आहे. ” असं म्हणत ममताने या व्हिडिओद्वारे अनेक खुलासे केले आहेत.
#WATCH | Prayagraj | Mamta Kulkarni says, “I am resigning from the post of Mahamandaleshwar of Kinnar Akhada. I have been ‘sadhvi’ since my childhood and I’ll continue to be so…”
(Source – Mamta Kulkarni) pic.twitter.com/iQAmmBkjVR
— ANI (@ANI) February 10, 2025
ममताला महामंडलेश्वर बनायचे नव्हते
महामंडलेश्वर पदावरून वादा निर्माण झाला तेव्हा एका मुलाखतीत ममता कुलकर्णीने तिला महामंडलेश्वर बनायचच नव्हतं किंवा तशी हावही नव्हती असं स्पष्टही केलं होतं. ममताने तिच्या होण्याच्या प्रवासाबद्दल सांगत तिला कधीही महामंडलेश्वर व्हायचे नव्हते, परंतु किन्नर आखाड्याचे आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या दबावाखाली तिने महामंडलेश्वर होण्यास होकार दिला. असल्याचं तिने म्हटलं होतं. आता तर व्हिडीओद्वारे तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
ममता कुलकर्णीची भारतात आल्यापासून चर्चा
ममता कुलकर्णी अनेक वर्ष भारताबाहेर राहत होती आणि तिने अनेक वर्षांपूर्वी चित्रपटांपासून स्वतःला दूर केले होते. जेव्हा ती भारतात परतली तेव्हापासून तिची चर्चा सुरु झाली. 24 जानेवारी रोजी ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. तथापि, काही वादांनंतर, हे पद त्यांच्याकडून परत घेण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List