“भैया थोडा और तीखा बनाओ”; मोफत मिळालेल्या पाणीपुरीवर श्रद्धा कपूर तुटून पडली
श्रद्धा कपूर आणि लेखक राहुल मोदी गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. दोघांनाही अनेक वेळा एकत्रही पाहिलं गेलं आहे. अलिकडेच श्रद्धाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये राहुल मोदी तिच्यासोबत एका कार्यक्रमात दिसत आहे. श्रद्धा कपूर अहमदाबादमध्ये राहुल मोदींसोबत एका लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहिली होती. यादरम्यान, दोघेही रोमँटिक पोज देताना दिसले, ज्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना उधाण आलं. दरम्यान याचवेळेसचा श्रद्धा कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये ती पाणीपुरीचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे
श्रद्धाचे सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य
एका फॅन पेजने श्रद्धा कपूरचे काही फोटो शेअर केले, जे व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये श्रद्धा सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. यादरम्यान, ती स्टेजवर जाऊन वधू-वरांना भेटतानाही दिसत आहे. यावेळी श्रद्धासोबत उपस्थित असलेल्या राहुल मोदीचीही तेवढीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे. राहुलने कार्यक्रमात राखाडी रंगाचा सूट घातला होता. दोघांनीही वधू-वरासोबत पोजही दिल्या होत्या. ते फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
श्रद्धा कपूरने खाल्ली अनलिमिटेड पाणीपुरी
श्रद्धा कपूरने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती गोलगप्पा म्हणजे पाणीपुरी खाताना दिसत आहे. पाणीपुरी खाताना फोटो शेअर करताना श्रद्धाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ” खाताना मी मोजायला विसरले, नंतर मला आठवले की लग्नात ते अनलिमिटेड असते” या कॅप्शनवरून तिने अनलिमिटेड पाणीपुरी खाल्ल्याचं लक्षात येतं. तसेही श्रद्धा कपूरबद्दल किती खवय्यी आहे हे सर्वांना माहिती आहे. ती अनेकदा फूडसोबत, किंवा एखाद्या खास पदार्थ खातानाचे फोटो शेअर करताना दिसते.
चाहत्यांनीही केल्यात मजेदार कमेंट्स
श्रद्धाच्या पाणीपुरी खातानाच्या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजर्सने लिहिले आहे की, “आम्हाला कधी मिळणार पाणीपुरीची पार्टी?” असा प्रश्न विचारला आहे, तर दुसऱ्या एका युजर्सने म्हटले, “तुम्हाला खायला जास्त काय आवडतं?” तर एका व्यक्तीने म्हटले, तर एकानं कमेंट केली आहे दुसरा म्हणाला, “भैया थोडा और तीखा बना दो”.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List