कर्नाटकात जाणाऱ्या एसटीच्या बसेसबाबत महामंडळाचा मोठा निर्णय, काय झाले पाहा ?

कर्नाटकात जाणाऱ्या एसटीच्या बसेसबाबत महामंडळाचा मोठा निर्णय, काय झाले पाहा  ?

कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे एसटीला अडवून काही समाजकंटकांनी एसटीच्या चालकाला धक्काबुक्की करून काळे फासण्याची घटना घडली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करत आहोत, तसेच प्रवासी आणि आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा पहाता अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात याव्यात असे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार यांना दिले आहेत. त्यामुळे कर्नाटकात एसटीच्या बसेस आता पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहणार आहेत.

या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दूरध्वनीवर बोलून त्यांना धीर दिला आहे. या प्रकरणात तुम्ही एकटे नसून सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे असेही सरनाईक यांनी त्यांना आश्वस्थ केले आहे. तसेच कर्नाटक सरकार या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत महाराष्ट्र सरकारशी चर्चा करत नाही तोपर्यंत कर्नाटक राज्यात महाराष्ट्राच्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द राहतील असेही आदेश मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.

सीमावर्ती भागात तणाव

काल रात्री शुक्रवार दि.२१ रोजी रात्री ९.१० वाजता मुंबई आगाराची बस बंगळुरू -मुंबई येत असताना (बस क्रमांक MH14 K Q 7714) चित्रदुर्गच्या अलीकडे 2  किलोमीटर आली असता ,कथित कर्नाटक संघटनेचे कार्यकर्त्यांनी  गाडी अडवून बस आणि बस चालकाला काळे फासल्याचा प्रकार केला आहे . तसेच कर्तव्यावर असणाऱ्या चालक भास्कर जाधव यांना मारहाण देखील केली. (दोघेही कोल्हापूर आगारात कार्यरत ) त्यानंतर वरिष्ठांच्या सुचनेनुसार त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्यात आली आहे. आज सकाळी विभाग नियंत्रक कोल्हापूर यांनी बसआणि चालक – वाहक यांना सुखरूप कोल्हापूर येथे आणले. तसेच, सीमावर्ती भागातील तणाव लक्षात घेता, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणारे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापुरातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत असे एसटी महामंडळ कडून कळवण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एलओसीजवळ भूसुरुंगाचा स्फोट; जवान जखमी एलओसीजवळ भूसुरुंगाचा स्फोट; जवान जखमी
जम्मू-कश्मीरच्या पूंछ जिह्यात भूसुरुंगाच्या स्फोटात आज एक जवान जखमी झाला. नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालत असताना भूसुरुंगाचा स्पह्ट झाल्याने जवान...
भागोजीशेठ कीर यांच्या जयंती सोहळय़ानिमित्त बुधवारी भव्य शोभायात्रा
आंगणेवाडीत भाविकांना शिवसेनेतर्फे पाणी वाटप
22 हिंदुस्थानी मच्छीमारांची पाकच्या तुरुंगातून सुटका
मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त, सहाय्यक अधिकारी ट्रॅप
डोंगरीत 58 लाखांचा गुटखा पकडला; दोघांना अटक
भाजपच्या उत्तराखंडात प्रताप, वनीकरणाच्या पैशाने घेतले आयफोन