Raj Thackrey : मी वाट बघतोय… राज ठाकरे यांची एक पोस्ट, सोशल मीडियावर तुफान चर्चा

Raj Thackrey : मी वाट बघतोय… राज ठाकरे यांची एक पोस्ट, सोशल मीडियावर तुफान चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मराठीच्या वापराबद्दल नेहमीच आक्रमक भूमिका घेताना दिसतो. महाराष्ट्रात मराठीचा वापर केला पाहिजे, मराठी बोललं पाहिजे, दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात अशा अनेक मुद्यांचा पाठपुरावा मनसेने वेळोवेळी केला आहे. दरम्यान यंदाचा मराठी भाषा गौरव दिन मनसेकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने दादरमधील छत्रपती शिवाजी मैदान इथं विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत पुस्तक प्रदर्शनही भरवण्यात येणार असून त्याच संदर्भात राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत राज्यातील जनतेला खास निमंत्रण दिलं आहे. राज ठाकरे यांनी आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची पोस्ट केल्याने सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

काय आहे राज ठाकरे यांची पोस्ट ?

X या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवर राज ठाकरे यांनी एक पोस्ट केली आहे. ” येत्या 27 फेब्रुवारी 2025 ला, मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे 2 मार्च 2025 पर्यंत असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन येत आहेत. मराठी साहित्याचं दर्शन घडवणारं हे सगळ्यात मोठं पुस्तक प्रदर्शन असेल याची मला खात्री आहे.” असं त्यांनी नमूद केलं आहे.

या प्रदर्शनाचं औपचारिक उदघाट्न झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी असा विचार डोक्यात आला, आणि जवळपास 17 मान्यवरांशी मी बोललो आणि प्रत्येकाने आनंदाने या कल्पनेला होकार दिला. इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल, तो प्रत्यक्ष अनुभवायला याच. पण, या पुस्तक प्रदर्शनाला, तुमच्या कुटुंबाला घेऊन नक्की या, असं निमंत्रण राज ठाकरेंनी जनतेला दिलं आहे.

 

मी वाट पाहतोय

राज ठाकरे यांनी या पोस्टमधून पुस्तक प्रदर्शनामागील हेतूही स्पष्ट केला आहे. ” आपली मराठी भाषा ही आपली ओळख आहे आणि आपली शक्ती पण. या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे हे पुढच्या पिढयांना कळायलाच हवं” असं त्यांनी लिहिलं आहे. ” आणि हे का करावं लागेल तर आजकाल दोन मराठी माणसं सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. असं का होतंय हे कळत नाही…मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरु आहे, पण मराठी ही आता ज्ञानची भाषा देखील व्हायला लागली आहे. जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तकं मराठीत येत आहेत, ज्यातून बदलत्या जगाचं भान येणं सहज शक्य आहे. हे आत्ताच पुढच्या पिढ्यांच्या मनात रुजवावं लागेल. आणि हे जर घडलं तर अजून ताकदीने लेखक, विचारवंत या भूमीत निर्माण होतील. मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे, पण त्यासाठीची खिडकी ही मराठीची असावी. आणि म्हणूनच हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत. जरूर या प्रदर्शनाला भेट द्या. वाट बघतोय… ” असं राज ठाकरे यांनी नमूद केलं आहे.

आशा भोसले ते लक्ष्मण उत्तेकर…

या अभिजात पुस्तक प्रदर्शन सोहळ्यात आशा भोसले, जावेद अख्तर, अशोक सराफ, सोनाली बेंद्रे, विकी कौशल, आशुतोष गोवारीकर, अभिजात जोशी, रितेश देशमुख, शर्वरी वाघ, नागराज मंजुळे, विजय दर्डा, भरत दाभोळकर, गिरीश कुबेर, पराग करंदीकर, राजीव खांडेकर, महेश मांजरेकर, लक्ष्मण उतेकर आदी मान्यवर आपल्या आवडीची कविता म्हणणार आहेत. या कार्यक्रमात खुद्द राज ठाकरेही त्यांच्या आवडीची कविता सादर करणार आहेत. त्यामुळे या दिग्गजांच्या कविता ऐकण्याची पर्वणीच या सोहळ्यात मिळणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kolhapur News – पन्हाळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळला साप Kolhapur News – पन्हाळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळला साप
ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर “पन्हाळगडचा रणसंग्राम, पन्हाळ गडावरून सुटका” लघुपट व 13 डी थिएटरचा शुभारंभ सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
Santosh Deshmukh Case – अशी वेळ इतर कुणावरही येऊ नये, यात कुणाचा हात आहे त्याला शिक्षा दिली पाहिजे, वैभवी देशमुखची सरकारकडे मागणी
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ
IPS अधिकाऱ्याची सावत्र मुलगी अन् अभिनेत्री सोन्याच्या तस्करीत, 13 कोटींचे सोने जप्त, बॉलीवूड स्टाईलने तस्करी
राज्यातील 58, 394 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, अजूनही मिळाले नाही अनुदान
राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती…
Video – मुंबईने सर्वधर्मीयांच्या पोटाची काळजी घेतली – भास्कर जाधव