राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश; नेत्याला पश्चताप, दोनच दिवसांमध्ये घेतला मोठा निर्णय; म्हणाला चूक झाली…
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभिजीत पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अभिजीत पवार हे दोनच दिवसांमध्ये शरद पवारांकडे परतले आहेत. अभिजीत पवार यांच्यासह हेमंत वाणी यांनी देखील अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा एकदा अभिजीत पवार यांची घरवापसी झाली आहे. अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी आपल्यावर दबाव होता असा गौप्यस्फोट अभिजीत पवार यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले अभिजीत पवार?
अभिजीत पवार यांनी हेमंत वाणी यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र दोनच दिवसांमध्ये त्यांची घरवापसी झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करावा यासाठी दबाव होता असा आरोप त्यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, नजीम मुल्ला यांनी पक्षप्रवेशासाठी आपल्याला ब्लॅकमेलिंग केलं, पण त्या ब्लॅकमेलिंगला मी आता बळी पडणार नाही. माझी एवढीच चूक झाली की मी साहेबांशी बोलायला हवं होतं, पण मी तणावात होतो. त्यामुळे हा सर्व प्रकार घडला. राजकारणात सगळा सावळा गोंधळ सूरू आहे, असं अभिजीत पवार यांनी म्हटलं आहे. अभिजीत पवार यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात घरवापसी झाली आहे.
आव्हाडांचे निकटवर्तीय
अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जातात. आव्हाडांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता, मात्र त्यानंतर आता ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात परतले आहेत. आपल्यावर पक्षप्रवेशासाठी दबाव होता असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. मात्र आता आपणं ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List