मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला
देशातील विरोधी पक्षांची अवस्था लकवा मारल्यासारखी झाल्याची टीका केली वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोशल मीडियावर श्रंद्धाजली वाहणारी पोस्ट केल्याने वादंग उठले. परंतू राहुल गांधी यांनी ती पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॉपी केल्याचा टोला प्रकाश आंबडेकर यांनी लगावला आहे. विरोधी पक्षांनी स्वत:ला दुरुस्त करावे आणि हिटलर शाहीचा विरोध करावा,असा सल्ला देखील आंबेडकर यांनी विरोधी पक्षांना दिला आहे.
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत निर्णय लागो किंवा न लागो एप्रिल महिन्यात या निवडणुका घ्याव्याच लागतील,असं मत देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. काही दिवसात डॉलरचा दर शंभर रुपयांपर्यंत पोहोचेल,त्यामुळे भारतीय अर्थ व्यवस्थावर असणारे संकट मोठे आहे,पण दुर्दैवाने विरोधी पक्ष राष्ट्रवादी,काँग्रेस इतर पक्षांनी घसरत चाललेल्या अर्थ व्यवस्थेवर मौन पाळलेले दिसतंय,असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.
राहुल सोलापूरकर सारख्यांना टार्गेट दिलंय
ते पुढे म्हणाले की ‘छावा’ चित्रपट आपण अर्धाच पाहिला आहे,पण मराठा समाजाला आवाहन आहे, छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांनी निर्माण केलेला इतिहास प्रेरणादायी आहे.सध्या इतिहासामध्ये अडकून राहण्याऐवजी स्फूर्ती घेऊन नवीन इतिहास निर्माण करण्याच्या मानसिकतेत मराठा समाजाने आले पाहिजे,असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्याबद्दल बोलताना अशा माणसांना टार्गेट देण्यात आले आहे. भाजपाचे सरकार,राज्य पण भाजपाचे आणि विरोधी पक्ष पण भाजपाचे आहेत. भाजप ड्रायव्हर सीटवर बसलाय त्यांना विरोध करायला कोणीच नाही केवळ आपणच आहोत,असं देखील आंबेडकर यावेळी म्हणाले.
धनंजय मुंडे गौण आहेत
संतोष देशमुख प्रकरणात माझ्या दृष्टीने धनंजय मुंडे गौण आहेत, देशमुख यांचा हत्या करणारा कोण आणि त्यांना सांगणारा कोण हे महत्त्वाचं आहे आणि या दोघांच्यामध्ये धनंजय मुंडे कुठे असतील तर ते आरोपी आहेत,असं त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List