खोट्या अप्पीचे सत्य येणार का कुटुंबासमोर, ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये अमोलला आली शंका
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर.’ या मालिकेतील अप्पी, अर्जुन आणि अमोल ही तिनही पात्रे प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतात. या मालिकेत येणारी रंजक वेळणे प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करतात. आता या मालिकेत वेगळे वळण आले आहे. अप्पीने नवा कट रचला आहे. याची चाहून अमोलला लागली आहे. आता सत्य सर्वांसमोर येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अप्पी सारख्या दिसणाऱ्या दीपाला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचा आग्रह कुटुंबाने धरला आहे. पण अर्जुन या सगळ्याला नकार देतो. दरम्यान, अमोलच्या लक्षात आलंय की त्याच्या आईने त्याचं खास लॉकेट घातलेले नाही. स्वप्नील सर आणि दीप्या मामा अमोलला अप्पीसाठी नवे लॉकेट बनवण्यासाठी सांगतात. तो अप्पीकडे जेवण घेऊन जातो, पण जेवण्यापूर्वी दीपाला राजाचा संकेत मिळतो. ती ताबडतोब न जेवता निघून जाते. ज्यामुळे अमोलला धक्का बसतो कारण त्याची आई असं कधीच वागली नव्हती.
बाहेर, राजा दीपाला GG च्या योजनेबद्दल सांगतो आणि जर तिने खोटी स्वाक्षरी केली तर त्यांना १० लाख रुपये मिळतील असे सांगतो. पोलिस स्टेशनमध्ये, अर्जुन त्याच्या घराचा सीसीटीव्ही फुटेज पाहातोय. राजा आणि दीपा यांना मिळणाऱ्या पैशासाठी आनंद साजरा करताना पाहून त्याला धक्का बसतो.
इकडे स्वप्नील आणि दीप्या अमोलला नवीन लॉकेट देतात. अमोल ते दीपाकडे घेऊन जातो, पण तिला त्याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे ती काहीच प्रतिक्रिया देत नाही. यामुळे अमोलच्या मनात शंका निर्माण झालेय. अर्जुनने अमोलचा गोंधळ लक्षात घेऊन त्याला स्पष्ट केलंय, की अपघातामुळे आईची स्मरणशक्ती कमी झाली आहे. तिला वेळ द्यायला हवा. अमोलचा अर्जुनवर विश्वास बसतो. एकीकडे, अर्जुन खऱ्या अप्पीचा शोधात आहे आणि दुसरीकडे, तो स्वतःच्याच कुटुंबाला फसवत आहे. दरम्यान, अप्पी जिला बंदिवासात ठेवले आहे, तिची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी आखलेल्या बनावट स्वाक्षऱ्यांचा समावेश असलेली एक भयंकर योजना ऐकते आणि तिकडून सुटकेचा प्रयत्न करतेय. खरी अप्पी आपली सुटका करून घेण्यात यशस्वी होईल? का असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List