म्हणून तिला बांधून ठेवावं लागतं, नाहीतर पळून जाईल… लेक श्वेताबद्दल असं का म्हणाले बिग बी ?
Kaun Banega Crorepati : ‘कौन बनेगा करोडपति 16’ या शोमध्ये होस्ट अमिताभ बच्चन हे अनेकदा मजेदार, रंजक किस्से शेअर करताना दिसतात. नुकताच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये त्यांनी त्यांची लाडकी लेक श्वेता बच्चन हिच्याबद्दल एक विधान केलं. सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे.
‘कौन बनेगा करोडपती ‘ या शो ने गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं असून सध्या त्याचा 16 वा सीझन सुरू आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन हा शो होस्ट करतात आणि त्यांच्या बोलण्याचे, आवाजाचे तर सगळेच फॅन आहेत. या शोमध्ये अमिताभ बच्चन हे स्पर्धकांना फक्त प्रश्न विचारत नाहीत तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलवत, त्यांचा प्रवासही समजून घेतात. एवढंच नव्हे तर कधीकधी ते त्यांच्या आयुष्यातील किंवा इतर मजेशीर किस्सेही प्रेक्षकांसोबत शेअर करत असतात.
नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमझ्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लेकीशी, श्वेता बच्चन हिच्याशी निगडीत एक किस्सा सांगितला. एका गोष्टीमुळे तिला बांधून ठेवावं लागतं नाहीतर ती पळून जाते असं अमिताभ यांनी सांगितल्यावर सर्वांच्या भुवया उंचावल्या. बिग बींनी त्यावेळी श्वेताला इंजेक्शनबद्दल वाटणाऱ्या भीतीचा किस्सा सांगितला. ती मजेशीर गोष्ट ऐकून स्पर्धकांसह प्रेक्षकही खळखळून हसू लागले.
म्हणून तिला बांधून ठेवावं लागतं….
‘कौन बनेगा करोडपति 16’ या शोमध्ये काही दिवसांपूर्वी आयआयटी दिल्लीचे उत्सव दास हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत शानदारपणे खेळ खेलत 25 लाख रुपये जिंकले. यादरम्यान उत्सव दास यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. नीडल फ्री शॉक सिरींज ही कोणत्या इन्स्टिट्यूटने बनवली ? असा तो सवाल होता . त्यावर उत्सव दास यांनी लागलीच उत्तर दिलं, ते म्हणजे – आयआयटी बॉम्बे. उत्सव यांचा हा कॉन्फिडन्स पाहून अमिताभ बच्चन यांनीही त्यांचे कौतुक केलं.
ती तर पळूनच जाईल..
पण याचदरम्यान त्यांनी एक किस्साही सांगितला. बऱ्याच महिला या इंजेक्शनला घाबरतात असे त्यांनी म्हटलं पण प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनेक महिलांना त्यावर असहमती दर्शवली. मात्र ते पाहून अमिताभ यांनी आपल्या त्या विधानामागचा अर्थ स्पष्ट केला. ते म्हणाले ” मी हे बोलतोय कारण माझी जी लेक आहे श्वेता, तिला इंजेक्शन द्यायचं असेल तर तिला बांधूनच ठेवाव लागतं, नाहीतर इंजेक्शन पाहूनच ती धूम ठोकते, पळून जाते,” असा किस्सा अमिताभ बच्चन यांनी शेअर केला. ते एकून सगळेच जण खळखळून हसू लागले
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List