शिवनेरीवरील महोत्सवाच्या निधीत पाच कोटींची कपात, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महायुतीचे बेगडी प्रेम उघड

शिवनेरीवरील महोत्सवाच्या निधीत पाच कोटींची कपात, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महायुतीचे बेगडी प्रेम उघड

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी आणि जुन्नरमध्ये दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱया ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ निधीमध्ये महायुती सरकारने पाच कोटी रुपयांची कपात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन विधानसभा निवडणुकीत प्रचार करणाऱ्या महायुती सरकारने सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच शिवजयंतीला शिवरायांबद्दल असलेले आपले बेगडी प्रेम उघड केले आहे. हा निधी महाबळेश्वर महोत्सवाकडे वळवला आहे.

गतवर्षी शिवजयंती उत्सवासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने 9 कोटी रुपये खर्च केला होता. यंदा तो चार कोटी रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. पुणे जिह्यातील महोत्सव आणि कामांसाठी निधी मिळवण्याबाबत नेहमी अलर्ट असलेले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील शिवजयंतीच्या निधी कपातीवर गप्प आहेत. याशिवाय जिह्यातील कोणत्याही महायुतीच्या आमदाराने याबद्दल आवाज उठवलेला नाही. गेले वर्ष हे निवडणूक वर्ष असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मोत्सवासाठी मोठय़ा प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आले. त्यावर एकूण नऊ कोटी रुपये खर्च झाले. यंदादेखील याच दर्जाचे कार्यक्रम महोत्सवामध्ये नियोजित होते, पण निधीअभावी त्याला कात्री लावण्याच्या हालचाली सुरू आहेत.

शिवजयंती महोत्सवात दोन दिवसांची कपात

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय व पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाच दिवसांचा शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा यात दोन दिवसांची कपात करण्यात आली असून, तो तीन दिवसांचा केला आहे. 17 ते 19 फेब्रुवारीदरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे.

  • शासनाने शिवनेरी शिवजयंती महोत्सवाच्या निधीत थेट 60 टक्के कपात केली आहे. त्यामुळे पूर्वनियोजित अनेक कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. विशेष म्हणजे तत्कालीन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दरवर्षी शासनाच्या वतीने पाच दिवस शिवजयंती महोत्सव आयोजित करण्याची घोषणा केली होती. यंदा मात्र महोत्सव तीन दिवसांचा होणार आहे.
  • शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील पर्यटनवाढीसाठी विविध प्रयत्न करण्यात येत होते. महिला बचत गटाच्या माध्यमातून तालुक्यातील खाद्यसंस्कृती पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी खास बचतगट बाजार भरविण्यात येत होता. शिवकालीन खेडे तयार करण्यात आले होते. यंदा महोत्सवासाठी केवळ 4 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. परिणामी यातील अनेक कार्यक्रमांना कात्री लावावी लागली.
  • पर्यटन विभागाच्या सहसंचालक शमा पवार यांनी निधी कपातीच्या निर्णयाला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, ‘शिवजयंती महोत्सवाचा निधी निम्म्याने कमी केला आहे. यामुळे दरवर्षी आयोजित करण्यात येणारे काही कार्यक्रम यंदा कमी करण्यात आले आहेत.’

मिंधेंच्या मंत्र्याचा प्रताप… महाबळेश्वर महोत्सवासाठी निधी पळवला

शिवनेरीवरील महोत्सवाला देण्यात येणाऱया नऊ कोटी रुपयांच्या निधीमध्ये पाच कोटी रुपयांची कपात केली आहे. कपात केलेला हा निधी महाबळेश्वर महोत्सवाकडे पळविण्यात आल्याची चर्चा आहे. महाबळेश्वर महोत्सवाला दरवर्षी तब्बल 14 कोटींचा निधी देण्यात येतो. यंदा तो 21 कोटी रुपये करण्यात आला आहे. मिंधे गटाचे पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांनी हा ‘प्रताप’ केला आहे. विशेष म्हणजे निधी कपात करण्यात आलेल्या यंदाच्या शिवजयंती महोत्सवाच्या उद्घाटनासाठी येत्या 17 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जुन्नरमध्ये येत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलीस असो की अधिकारी या गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच, मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा पोलीस असो की अधिकारी या गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच, मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा
Home Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला मोठा इशारा दिला आहे. ड्रग्सच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस...
तब्बल ८५ वर्षांनंतर राज्य परिवहन विभागाला कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा, पाहा काय घडामोडी
‘पाल मेल्यावर शेपूट वळवळतं आता तेवढीच…’ रामदास कदमांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं
हिंदू अभिनेत्रीने केले होते मुस्लिम निर्मात्याशी लग्न, बदलले नाही आडनाव; आज आहे ४०० कोटींची मालकीण
त्यामुळे त्वचा सतत कोरडी पडते; वयाच्या ४०व्या वर्षी प्रार्थना बेहेरे करत आहे ‘या’ आजाराचा सामना
‘ही’ अभिनेत्री एकेकाळी कॉफी शॉपमध्ये वेटरचं काम करायची; आज बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री
रोस्टेड चिकन, स्प्रिंग ग्रीन सलाद अन् क्रीम ब्रुले तसंच राहिलं; आदेश येताच झेलेन्स्की यांना तडकाफडकी व्हाईट हाऊस सोडावं लागलं