आग नियंत्रणासाठी अग्निशमन दलाच्या जवानांची 42 मजल्यापर्यंत धावाधाव

आग नियंत्रणासाठी अग्निशमन दलाच्या जवानांची 42 मजल्यापर्यंत धावाधाव

भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील न्यू ग्रेट ईस्टर्न मिलजवळच्या सेलटेक या 57 मजली गगनचुंबी इमारतीच्या 42 व्या मजल्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला आग लागल्याने मोठी घबराट पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीच्या लिफ्ट बंद ठेवल्याने मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली. मात्र दलाच्या 16 जवानांनी वेळ वाया न घालवता धावत 42 वा मजला गाठला आणि आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले. सुमारे अडीच तासांच्या मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. सुदैवाने इमारतीतील रहिवासी वेळीच इमारतीबाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. घरात फर्निचरचे काम सुरू असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या आगीमुळे पुन्हा एकदा गगनचुंबी इमारतींना लागणाऱया आगींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एमबीबीएस प्रवेशात चांगल्या विद्यार्थ्यांचे पाय ओढले जातात, हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण एमबीबीएस प्रवेशात चांगल्या विद्यार्थ्यांचे पाय ओढले जातात, हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण
आपला समाज अशा स्तरावर गेला आहे की, एमबीबीएस प्रवेशात चांगल्या विद्यार्थ्यांचे पाय त्यांचेच सहकारी विद्यार्थी ओढतात, असे गंभीर निरीक्षण उच्च...
अर्थसंकल्पात प्रोत्साहनपर योजनेच्या थकबाकीचा उतारा, शेतकरी कर्जमाफीची घोषणा कागदावर
तुम्हाला आयाबहिणी आहेत की नाहीत? मंत्री योगेश कदम, संजय सावकारे यांच्याविरोधात प्रचंड संताप
कोर्ट रूममध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करणे पडले एक लाखाला, हायकोर्टाने गंभीर दखल घेतल्याने भरपाई देणार
काळोखाच्या सावल्या! पोलीस अमावास्येच्या रात्री घालतात गस्त, ब्रिटिशांनी सुरू केलेली परंपरा आजही जपली जातेय
‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादः संघर्ष आणि संकल्प’ पुस्तकाची जनता आवृत्ती प्रसिद्ध करा! शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 
एमटीडीसीकडून महिलांना  50 टक्के सवलत