‘जीबीएस’मुळे मिरज सिव्हिलमध्ये दोघांचा मृत्यू
‘जीबीएस’ झालेल्या दोन रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
मिरजेत मृत्यू झालेल्यांमध्ये हुक्केरी (जि. बेळगाव) येथील 14 वर्षीय मुलाचा आणि सांगोला (जि. सोलापूर) येथील 65 वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. कोल्हापूरमध्ये मृत पावलेली महिला चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील आहे. दरम्यान, ‘जीबीएस’ची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची राज्यातील संख्या 9वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
नागपुरात पहिला बळी
राज्यात जीबीएस अर्थात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नागपूरच्या पारडी शिवारात राहणाऱया एका 45 वर्षीय रुग्णाचा शुक्रवारी सायंकाळी उपचारादरम्यान जीबीएसमुळे मृत्यू झाला. नागपूरमधील या रुग्णाला 11 फेब्रुवारीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाच्या दोन्ही हातापायाला लकवा मारला होता. शिवाय रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने प्रपृती अधिक बिघडल्याने शुक्रवारी सायंकाळी शासकीय रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हा रुग्ण दगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List