Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 1 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी
आजचे पंचाग
तिथी -फाल्गुन शुद्ध द्वितीया
वार – शनिवार
नक्षत्र -पूर्वाभार्द्रपदा
योग – साध्य
करण – बालव
राशी – मीन
मेष
मेष राशीच्या लोकांचे मन आनंदी आणि उत्साही असेल. मात्र, व्यय स्थनात चंद्र,राहू असल्याने खर्च वाढू शकतो. तसेच विनाकारण ताणतणाव येण्याची शक्यता आहे. यापासून दूर राहिल्यास आजचा दिवस आनंदात जाणार आहे. विनाकारण वाद होणार नाही, याची काळजी घ्या. बोलण्यात संयम ठेवा. चैनीच्या गोष्टी, कपडे इत्यादींवर खर्च होण्याची शक्यता आहे.
वृषभ
वृषभ राशीचे लोकांची दिवस मजेत जाणार आहे. एकादश स्थानात चंद्र,राहू असल्याने अचानक धनलाभाचे योग आहेत.त्यामुळे घरातही उत्साहाचे वातावरण असेल. आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. ही भरपूर असेल. नोकरीत बदली, बढतीचे योग आहेत. प्रगतीचे मार्ग खुले होतील. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यास योग्य दिवस आहे.
मिथुन
मिथुन राशीला आज नशिबाची साथ मिळणार आहे.मात्र, दशम स्थानात चंद्र, राहू असल्याने सुस्ती, आळस जाणवणार आहे. एखादे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कुटुंबियांना वेळ देता येणार असल्याने मरगळ झटकून बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. आत्मविश्वास आणि मन प्रसन्न ठेवल्यास दिवस आनंदात जाणार आहे.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. भाग्य स्थानात चंद्र, राहू असल्याने ठरलेले बेत रद्द झाल्यास मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. बोलण्यात संयम ठेवत वादविवाद टाळा. अचानक महत्त्वाचे काम आल्याने धावपळ वाढणार आहे. कोणत्याही गोष्टीचा ताण न घेता कुटुंबासोबत वेळ घालवल्यास आजचा दिवस समाधानात जाणार आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस चढउतरांचा असेल. मनात अनेक विचार येणार आहेत. अष्टम स्थानात चंद्र, राहू असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी, विनाकारण धावपळ-दगदग टाळण्याची गरज आहे. सप्तमातील शनीचा प्रभाव कमी होत असल्याने व्यवसायातील अडचणी कमी होत व्यवसायवाढीचा मार्ग मोकळा होणीर आहे. जोडीगार, मित्र, कुटुंबीयांचे चांगले सहकार्य मिळणार आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांनी वादविवाद आणि नकारात्मक विचारापासून दूर राहण्याची गरज आहे. सप्तम स्थानात चंद्र राहू असल्याने जोडीदाराशी किंवा व्यव्सायतील भागीदारांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन अशांत राहणार आहे. सद्यस्थितीत मार्ग काढत संयम राखण्याचा प्रयत्न करा. कुटुंबीयांच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी व्यवसायानिमित्त प्रवासाची शक्यता आहे.
तूळ
तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र असेल. षष्ठ स्थानात चंद्र- राहू असल्याने साथीचा आजार होणार नाही याची काळजी घ्या. गुंतवणुकीबाबतचे निर्णय काही दिवस पुढे ढकला. नकारात्मक विचार येत असले तरी कार्यक्षेत्रात मनासारथी बढती-बदली मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे इतर गोष्टींपेक्षा कामावर लक्ष केंद्रीत करा. सहकारी आणि कुटुंबीयांचे चांगले सहकार्य मिळणार आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. आता शनीच्या अडीचीचा प्रभाव कमी होत असल्याने मनासारखी कामे होणार आहे. मात्र, अतिआत्मविश्वास आणि अतिउत्साह टाळण्याची गरज आहे. एखादी नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी शिकण्यासाठी चांगला काळ आहे. मुलांबाबतची चिंता दूर होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस आनंदात जाणार आहे.
धनु
धनु राशीच्या लोकांना आज मनोबल वाढवण्याची गरज आहे. मनात येणारे नकारात्मक विचार दूर करण्याची गरज आहे. चतुर्थ स्थानात चंद्र राहू असल्याने कुटुंबियांकडून सहकार्य मिळणार आहे. मात्र, त्यांच्याशी मतभेद टाळण्याची गरज आहे. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढण्याचे योग आहेत. काही आर्थिक निर्णय काही दिवस पुढे ढकलावे.
मकर
मकर राशीच्या लोकांना उत्साह जाणवणार आहे. मात्र, उत्साहाच्या भरात जास्त काम ओढवून घेतल्यास थकवा जाणवणार आहे. आता साडेसातीचा अखेरचा टप्पा संपत आल्याने नैराश्य दूर होण्यास सुरुवात होणार आहे. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग आहेत. त्यामुळे मन आनंदी होईल. तृतीय स्थानातील चंद्र राहूमुळे भावंडाशी वादविवाद होणार नाही, याची काळजी घ्या. आजचा दिवस सकारात्मक आहे.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आज धनलाभाचे योग आहेत. तसेच कुटुंबासाठी आज जास्त वेळ द्यावा लागणार आहे. मात्र, स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढणार आहे. द्वितीय स्थानात चंद्र राहू असल्याने अचानक धनलाभ होऊ शकतो. साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असल्याने नकारात्मक विचारांवर मात करत पुढे जावे लागणार आहे. कुटुंब,सहकारी आणि मित्रांकडून सहकार्य मिळण्याचे योग आहेत.
मीन
मीन राशीच्या लोकांनी मन प्रसन्न ठेवल्यास आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. प्रथम स्थानात असणाऱ्या चंद्र राहूचे सहाकार्य मिळणार आहे. मन आनंदी असून तुमच्यात आत्मविश्वासही दिसणार आहे. साडेसातीचा पहिला टप्पा सुरू असल्याने संयम ठेवणे गरजेचे आहे. कोणालाही शब्द देत त्यात अडकू नका. आजचा दिवस सकारात्मक असल्याने अपेक्षित बदलांसाठी प्रयत्न सुरू केल्यास त्याचा फायदा होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List