मोठी बातमी! ‘शरद पवारांनी विश्वासघात केला’; विनायक राऊत आक्रमक, मविआमध्ये फूट?
मोठी बातमी समोर येत आहे, मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मात्र त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर घणाघात केला, त्यानंतर सुषमा अंधारे यांनी देखील निशाणा साधला. संजय राऊत व सुषमा अंधारे यांच्यानंतर आता विनायक राऊत देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले विनायक राऊत
मंगळवारी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत यांनी शरद पवारांवर मोठा आरोप केला आहे. ‘शरद पवार साहेबांनी गद्दार आणि बेईमान व्यक्तीचा सन्मान केला आहे. यावर जे संजय राऊत साहेब बोलले ते अगदी बरोबर आहे. राऊत साहेब सत्य आहे ते बोलले आहेत. शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवला होता, पण विश्वासघात झाला, असं राऊत साहेबांनी म्हटलं आहे’ असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राजन साळवी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जे राजन साळवी सामंत कुटुंबावर टीका करत होते, आता त्या साळवींवर सामंत कुटुंबाचा नोकर म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. भाजपमध्ये जायचं आहे असं किमान 100 पेक्षा अधिक बैठकामध्ये ते बोलले होते, पैशांनी विकले जाणारे महाशय हेच आहेत. उदय सामंत यांना शह देण्यासाठी राजन साळवी यांना घेतलं आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List