शरद पवारांची गुगली, ठाकरे गटाची विकेट, राऊतांचा थयथयाट; शिंदे गटांचं जशास तसं प्रत्युत्तर काय?

शरद पवारांची गुगली, ठाकरे गटाची विकेट, राऊतांचा थयथयाट; शिंदे गटांचं जशास तसं प्रत्युत्तर काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल दिल्लीत सत्कार सोहळा झाला. ज्येष्ठे नेते शरद पवार यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर जोरदार टीकास्त्र डागले. शरद पवार यांनी या सोहळ्याला जाणे टाळायला हवे होते, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या विधानाने राज्यातील राजकारण पेटले आहे. शिंदे गटासह राष्ट्रवादीतील नेत्यांनी राऊतांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

शिंदेच्या त्या विधानाची चर्चा

या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. त्याचं कोडकौतुक केलं. त्याचवेळी शरद पवार यांनी टाकलेली गुगली भल्याभल्यांना कळत नाही, असे वक्तव्य केले. तर आज संजय राऊत यांनी जी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शिंदे यांचे पवार यांच्याविषयीचे वक्तव्य चर्चेत आले आहे.

संजय राऊत ऐवढे मोठे झाले का?

हेच संजय राऊत पूर्वी काय म्हणायचे. पवार साहेबांसारखा नेता राज्याला देशाला मिळाला हे भाग्य आहे. महाराष्ट्राचा सुपुत्राचा सत्कार काल झाला आणि महाराष्ट्राच्या सुपुत्राने केला. पवार साहेबांनी काय करायला पाहिजे काय नको हे सांगण्याइतके संजय राऊत मोठे नाही, असा टोला मंत्री शंभुराज देसाई यांनी लगावला.

मग महाविकास आघाडीतून बाहेर पडा

संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. एकनाथ शिंदेनी जे काही काम केलं, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी शिंदेना मिळाली आणि त्यानी ते सिद्ध केलं आहे. सध्या राऊत हे बरळत असल्याचा टोला त्यांनी लगावला. जर राऊतांना इतके वाटत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांना माहिती आहे की, महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास राज्यात त्यांची काय अवस्था होईल, असा टोला त्यांनी लगावला.

ते दुतोंडी सापासारखे

ठाण्याचा विकास कोणी केला हे जनतेने दाखवून दिले आहे. शिवसेनेची स्थापना झाली, ती वाढली त्यावेळी संजय राऊत हे शिवसेनेत नव्हते. त्यांनी यासंदर्भात बोलू नये. ते दुतोंडी सापासारखे आहेत, अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली. शरद पवार यांनी काय करावं आणि काय नाही, हे जर संजय राऊत ठरवायला लागले तर याचा राष्ट्रवादीने विचार करावा असे ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चंद्रावर सुरू होणार मोबाईल आणि इंटरनेट सेवा, NOKIA सह NASA लॉन्च करणार मिशन चंद्रावर सुरू होणार मोबाईल आणि इंटरनेट सेवा, NOKIA सह NASA लॉन्च करणार मिशन
चंद्रावर मानवी वसाहत आणि रस्ते-रेल्वे नेटवर्कच्या तयारीदरम्यान अमेरिकन अंतराळ संस्था नासा मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. यासाठी नासाने...
स्वारगेट महिला अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट, या गंभीर त्रुटीमुळे घटना घडल्याचा दावा…
राखी सावंत बनणार पाकिस्तानची सून; ड्रामा क्वीनच्या हातात कोणी घातली अंगठी?
शरीरात या 5 जागी दुखत असेल तर समजून जा, कॉलेस्ट्रॉल वाढलंय…
महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले सहा जण बुडाले
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते राजकारणातून हद्दपार होणार? केंद्र सरकारने मांडली सर्वोच्च न्यायालयात बाजू
स्वारगेट बलात्कार प्रकरणी शिवसेनेचा दणका, वसंत मोरेंच्या नेतृत्वात आंदोलन