‘त्या’ नेत्याचे नाव उघड होणार की नाही? अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले तरी अद्याप पोलिसांचा तपास सुरूच आहे. त्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशमुखांच्या मारेकऱयांकडून जप्त केलेल्या मोबाईल फोनमधील डाटा अजून का मिळाला नाही? त्या नेत्याचे नाव कधी उघड होणार की नाही, असा सवाल करत दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राजकीय दबाव असल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नाही, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. 9 डिसेंबरला आरोपींचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले होते. त्यातील डाटा रिकव्हर केला जाईल असे सांगितले जात होते. परंतु अद्याप काहीच पुढे आलेले नाही असे सांगतानाच, जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत तपासाला योग्य दिशा मिळणार नाही, असे दमानिया म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List