Santosh Deshmukh Case : स्कॉर्पिओत आढळलेल्या मोबाईलच्या फॉरेन्सिक रिपोर्टचं काय झालं? अंजली दमानिया यांचा सवाल

Santosh Deshmukh Case : स्कॉर्पिओत आढळलेल्या मोबाईलच्या फॉरेन्सिक रिपोर्टचं काय झालं? अंजली दमानिया यांचा सवाल

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपींनपैकी एक असलेल्या कृष्णा आंधळे याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही, तो अद्यापही फरार आहे. यातच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य होणार का? या प्रकरणी खूप काही लपवलं जातंय, असं सामाजिकी कार्यकर्ता अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. X वर एक पोस्ट करत त्यांनी याप्रकरणी पोलिसांच्या तपासात स्कॉर्पिओत आढळलेल्या मोबाईलच्या फॉरेन्सिक रिपोर्टचं काय झालं? असा सवालही उपस्थित केला आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

X वर पोस्ट अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, ‘9 तारखेला काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल मिळाले होते. त्यात एका बड्या नेत्याचा फोन आला होता, अशी बातमी माध्यमांनी दाखवली होती. तो मोबाईल डेटा रिट्रीव करण्यासाठी फॉरेन्सिकमध्ये पाठवण्यात आला होता, आता 2 महिने झाले. कधी मिळणार तो डेटा ? कधी कळणार त्या नेत्यांचे नाव? आणि त्यांना वाचण्यासाठी कराड सुद्धा सुटणार, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

दमानिया म्हणाल्या की, 19 जून रोजी सातपुडा या शासकीय बंगल्यात आवदा कंपनी बरोबर 3 कोटीचा व्यवहार झाला, असे सुरेश धस म्हणाले होते. मग त्यात पुढे काय चौकशी झाली? काय स्टेटमेंट घेतली? अवादाच्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट घेतली का? मग धनंजय मुंडे यांच्यावर का गुन्हा झाला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या पोस्टच्या शेवटी त्यांनी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार का? असा सवाल विचारला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गप्पा, हास्यविनोद… राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा भेटले, निमित्त लग्न सोहळा; तीन महिन्यात कितवी भेट? गप्पा, हास्यविनोद… राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा भेटले, निमित्त लग्न सोहळा; तीन महिन्यात कितवी भेट?
विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाला मोठ्या अपयशाला सामोरे जावं लागलं आहे. ठाकरे गटाचे तर आजवरच्या निवडणुकीतील सर्वात कमी आमदार...
Sindhudurg News – आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या हिरकमहोत्सवानिमित्त नाटके व एकांकिकांची मेजवानी
हिंदुस्थानचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, जम्मू कश्मीरमध्ये चाहत्यांनी फोडले फटाके
शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार
‘साहित्य महामंडळानं माफी मागावी’, संजय राऊत यांची मागणी; उषा तांबेंचं एका वाक्यात उत्तर
‘बाथरूममध्ये जाऊन चार तास…’ पत्नी सोनियाने सांगितलं हिमेश रेशमियाचं ते सिक्रेट, अभिनेत्याची झाली चांगलीच पंचाईत
छावा चित्रपटच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के घराणे आक्रमक, आता ठरवली अशी रणनीती