स्वयंपाकघरातील ‘हे’ ३ मसाल्यांचे पाणी प्या आणि झटपट वजन करा कमी

स्वयंपाकघरातील ‘हे’ ३ मसाल्यांचे पाणी प्या आणि झटपट वजन करा कमी

आजकाल बहुतेकजण वजन वाढतच आहे अशी तक्रार करताना आपल्याला पाहिला मिळत आहे. बाहेरचे जंकफूड, तेलकट पदार्थ यांचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने वजन वाढण्याच्या समस्या लवकर निर्माण होतात. त्यात वजन कमी करणे सोपे काम नाही. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम आवश्यक आहे. एकीकडे काही लोकं वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जातात. पण दुसरीकडे आहाराचे निर्बंध पाळत नाही. अशाने वजन कमी होणे कठीण होऊन जाते. वजन कमी करण्यासाठी शरीराचे चयापचय चांगल्या स्थितीत असणे खूप महत्वाचे आहे.

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. डिंपल जांगरा सांगतात की, वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील काही मसाल्यांचाही वापर करू शकता. हे मसाले वजन कमी करण्यासोबत प्रतिकारशक्ती वाढवेल, पचन सुधारेल. तज्ज्ञांनी स्वयंपाकघरातील 3 मसाल्यांचा उल्लेख केला आहे, ज्याचे पाणी तुम्हाला वजन कमी करण्यास सहज मदत करू शकते. चला जाणून घेऊयात असे कोणते 3 मसाले आहेत जे झटपट वजन कमी करतील.

वेलचीचे पाणी

तुम्हाला जर झटपट वजन कमी करायचे असल्यास वेलचीचे पाणी खूप फायद्याचे ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेवल्यानंतर 1 किंवा 2 लहान वेलची घेऊन पाण्यात चांगल्या प्रकारे उकळू घ्या. वेलीमध्ये मेलाटोनिन असते. त्यामुळे तुमचे चयापचय वाढवते. तसेच फॅट कमी करण्याची प्रक्रिया वेगाने होते. यात फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते.

बडीशेपचे पाणी

वजन कमी करण्याची चिंता सतावत आहे तर तुमच्या डाएट प्लॅन मध्ये बडीशेपच्या पाण्याचा समावेश करा. कारण वजन कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी पिणे देखील खूप फायदेशीर आहे. यात फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.ज्याने तुमचे अन्न पचनास मदत करते आणि चयापचय वाढवते. एक चमचा बडीशेप पाण्यात उकळून गाळून घ्या. तसेच तज्ञांचे म्हणणे आहे की बडीशेपचे पाणी इन्सुलिन आणि कोलेस्ट्रॉल व्यवस्थापित करण्यास मदत करते. पोटाचे फॅट कमी करण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.

अदरकचे पाणी

अदरकचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते तसेच गॅस आणि सूज देखील कमी होते. यामुळे पचनक्रियाही सुधारते. तुम्ही अदरकचा एक छोटा तुकडा घेऊन पाण्यात उकळू घ्या आणि जेवणानंतर अदरकचे पाणी पिऊ शकता. यामुळे वजन सहज कमी होण्यास मदत होईल. या पाण्यात तुम्ही चिमूटभर काळी मिरीची पूड देखील घालू शकता. यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे जळजळ कमी करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर प्रसिद्ध गायक प्रीतम यांच्या ऑफिसमधून 40 लाख लंपास करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या, चोरी करण्याचे धक्कादायक कारण समोर
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यावेळी प्रीतम चक्रवर्ती यांच्या ऑफिसमधील 40...
Ranveer Allahbadia चं समर्थन करणं राखी सावंतला भोवलं, पोलिसांनी बजावलं समन्स
उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती
“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री