“शर्टलेस किंवा कुठेही झोपलेला दिसता कामा नये..”; आर. माधवनने मुलाला ‘या’ गोष्टीची दिली सक्त ताकीद

“शर्टलेस किंवा कुठेही झोपलेला दिसता कामा नये..”; आर. माधवनने मुलाला ‘या’ गोष्टीची दिली सक्त ताकीद

आपल्या नावापेक्षा आपल्या कामाने ओळखलं जावं, अशी अनेक कलाकारांची इच्छा असते. मात्र बॉलिवूड इंडस्ट्रीत असा एक कलाकार आहे, ज्याला त्याच्या मुलाच्या नावाने ओळखलं जाण्यात सर्वाधिक आनंद होतो. कारण त्याच्याच इतकी दमदार त्याच्या मुलाची कामगिरी आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून आर. माधवन आहे. आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवन हा भारतीय फ्री-स्टाइल स्वीमर आहे. वेदांतने मलेशिया ओपन स्पर्धेत आतापर्यंत पाच वेळा सुवर्णपदक पटकावलं आहे. तर डॅनिश ओपन स्पर्धेत त्याने सुवर्ण आणि रौप्यपदक आपल्या नावे केले आहेत. स्विमिंग विश्वात आर. माधवनच्या मुलाने खूप नाव कमावलंय. आपल्या मुलाच्या या कामगिरीबद्दल त्याचा खूप अभिमान वाटत असल्याची भावना आर. माधवनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केली. मात्र असं असलं तरी त्याला सतत त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत असल्याचं त्याने सांगितलं.

‘मिस मालिनी’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत माधवन म्हणाला, “जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती जवळ येऊन कौतुक करते की आम्हाला तुमचं काम आवडतं, तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. पण हे जेव्हा मुलगा वेदांतच्या बाबतीत होतं, तेव्हा अभिमानाने माझी छाती आणखी फुलते. करिअरच्या सुरुवातीलाच वेदांतला खूप प्रसिद्धी मिळतेय याचा आनंद तर आहेच, पण त्याला अजून खूप पुढे जायचं आहे. त्यामुळे मी त्याला या गोष्टीची आठवण करून देत असतो की, दुर्दैवाने किंवा सुदैवाने तू माझा मुलगा असल्याने तुला काही विशेषाधिकार आपसूकच मिळत जाणार आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

“मी त्याला सांगतो की, तू कुठेही शर्टलेस किंवा कुठल्याही बेडवर झोपलेला दिसू नये. कारण त्या अवस्थेतील त्याचा एक फोटो ही राष्ट्रीय बातमी बनू शकते. ते म्हणतील, दारू पिऊन झोपलाय किंवा आणखी काही.. तू तुझ्या मित्रांसारखा आलिशान किंवा मनमौजी आयुष्य जगू शकत नाही, याची सतत जाणीव मी त्याला करून देत असतो. प्रसिद्धी आणि आदर्श व्यक्तीमत्त्वाचं ओझं त्याला सतत वाहायचंच आहे”, असं माधवन पुढे म्हणाला.

एका मुलाखतीत वेदांतनेही त्याच्या या करिअरसाठी आईवडिलांनी केलेल्या त्यागाचा उल्लेख केला होता. “मला माझ्या बाबांच्या सावलीखाली जगायचं नव्हतं. मला माझं स्वत:चं नाव कमवायचं होतं. फक्त आर. माधवनचा मुलगा म्हणून मला राहायचं नाहीये. त्यांनी माझी नेहमीच काळजी घेतली आहे. आई आणि बाबा दोघंही माझ्यासाठी खूप काही करतात. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी केलेला सर्वांत मोठा त्याग म्हणजे ते मुंबई सोडून दुबईला राहायला आले”, असं तो म्हणाला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुड न्यूज! टेस्ला कंपनीची मुंबईत नोकरभरती!! गुड न्यूज! टेस्ला कंपनीची मुंबईत नोकरभरती!!
अमेरिकेतील श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीची टेस्ला पंपनी मुंबई आणि दिल्लीत नोकरभरती करणार आहे. टेस्ला पंपनीच्या कारची किंमत भरमसाट...
पुणेकरांनो, हा भूखंड घोटाळा हलक्यात घेऊ नका…बिल्डरचे उखळ होणार पांढरे, केवळ एक रुपया चौरस फूट भाडेपट्टी
नावातून फक्त एक शब्द काढल्याने 80 कोटींचे नुकसान, बिरा बिअर मेकर बी9 बेव्हेरजेस प्रायव्हेट लिमिटेडचा बोऱ्या वाजला
30 हजारांत अमर होण्याचे किट, अमेरिकन अब्जाधीश देतोय चिरतरुण राहण्याचा मंत्र
चीनची खोल समुद्रात उडी, समुद्रात ६५६० फूट खाली तयार होतंय स्पेस स्टेशन
मेटा कंपनीचा ह्युमनॉईड रोबोट योतोय, हुबेहूब माणसासारखा रोबोट, घरच्या कामात करणार मदत
एकाच कुटुंबात आयपीएस, आयएएस आणि आयआरएस