Mahakumbh 2025 – चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाला जाग, भाविकांच्या सुरक्षेसाठी 5 नवे नियम जारी

Mahakumbh 2025 – चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाला जाग, भाविकांच्या सुरक्षेसाठी 5 नवे नियम जारी

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या पवित्र महाकुंभमेळ्यात (Mahakumbh 2025) बुधवारी दुर्दैवी घटना घडली. येथे चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले. दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासन जागे झाले असून भाविकाच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलत पाच मोठे बदल केले आहेत.

महाकुंभाती 5 प्रमुख बदल-Complete No-Vehicle Zone
नो-व्हेइकल झोन: महाकुंभ मेळ्याच्या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे.

VVIP Passes Canceled:
व्हीव्हीआयपी पासेस रद्द: कोणत्याही विशेष पासद्वारे वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

One-Way Routes Implemented
एकेरी वाहतूक व्यवस्था: भाविकांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

Vehicle Entry Restricted
वाहनांच्या प्रवेशावर बंदी: प्रयागराजच्या शेजारील जिल्ह्यांतून येणारी वाहने गर्दी कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर थांबवली जात आहेत.

Strict Restrictions Until February 4
4 फेब्रुवारीपर्यंत कडक निर्बंध : सुव्यवस्था राखण्यासाठी 4 तारखेपर्यंत शहरात चारचाकी वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

कुंभ परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा या बदलांचा उद्देश असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना महाकुंभमेळ्याच्या व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यास सांगितले आहे. सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी पाच विशेष सचिव अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. महाकुंभातील व्यवस्था सुधारण्यासाठी हे सचिव 12 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजमध्ये राहतील, असे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय योग्य व्यवस्थापन आणि सुरक्षेसाठी एसपी अधिकारीही तैनात केले जाणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Guillain Barre Syndrome : जीबीएस आजाराचं थैमान सुरूच, आता साताऱ्यात चार रुग्ण आढळले; गावकरी भयभीत Guillain Barre Syndrome : जीबीएस आजाराचं थैमान सुरूच, आता साताऱ्यात चार रुग्ण आढळले; गावकरी भयभीत
पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातही जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण सापडण्याचे प्रकार सुरुच आहे. पुणे,सोलापूर, नागपूर पाठापाठ आता सातारा येथे देखील...
अंगात 103 ताप असतानाही पावसात शूट केलं गाणं; माहितीये ही अभिनेत्री नक्की कोण?
वाढलेली दाडी-केस, अंगावर फाटके कपडे; आमिर खान असा रस्त्यावर का फिरतोय? ओळखणेही कठीण
lifestyle news – नियमित एक केळं खाल्ल्याने हा होईल फायदा
Manoj Jarange Patil – ‘आता समोरासमोरची लढाई होणार’, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित
राजकुमार राव अन् पत्रलेखा आई-बाबा होणार?; अभिनेत्याने इंस्टा पोस्टवर स्पष्टच सांगितलं
स्मार्ट वॉच वापरताय? ठरू शकतं जीवघेणं, कसं ते पाहा