जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप झाले बंद

जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप झाले बंद

व्हॉट्सअ‍ॅप प्रत्येकालाच्या आयुष्यात महत्त्वाचा भाग बनला आहे. एक दिवस व्हॉट्सअ‍ॅप सुरू नसेल तर युजर हतबल होतात. असे असताना आता जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमावाल्या फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप सेवा बंद करण्यात आलेय. म्हणजे जुने आयओएस/आयफोन ज्यांच्याकडे आहेत, त्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप चालत नाही.

याआधी व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने जाहीर केले होते की, 5 मे 2025 पासून जुने आयओएस वर्जन म्हणजे जुन्या आयफोनवर सर्विस बंद होईल. 15.1 पेक्षा जुन्या व्हर्जन असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता असं दिसून येतंय की 5 मेच्या आधीच जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवाल्या आयफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सेवा बंद झाली आहे.

डब्ल्यूएबीटाइन्फोने ‘एक्स’ अकाऊंटवर स्क्रीनशॉर्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली. व्हॉटसअ‍ॅपने जुन्या आयओएस वर्जन आणि आयफोन मॉडेलचा सपोर्ट काढून घेतल्याची माहिती दिली. ज्यांच्या फोनमध्ये जुने बीट वर्जन आहे, ते केवळ एक महिना आणखी व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकतात.

कसे तपासाल

व्हॉट्सअ‍ॅपच्या निर्णयाचा तुमच्या फोनवर परिणाम होणार की नाही, कसे समजेल? तुम्हाला आयओएस व्हर्जन चेक करावे लागेल. त्यासाठी सेंटीगमध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेटवर टॅप करा. जर तुमच्या फोनमध्ये आयओएस १४ किंवा त्यापेक्षा जुने व्हर्जन असेल तर तुम्हाला अपग्रेडची गरज पडेल. जर अपडेट इन्स्ट़ॉल झाले नाही, तर समजून जा की तुम्हाला नव्या फोनची गरज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Guillain Barre Syndrome : जीबीएस आजाराचं थैमान सुरूच, आता साताऱ्यात चार रुग्ण आढळले; गावकरी भयभीत Guillain Barre Syndrome : जीबीएस आजाराचं थैमान सुरूच, आता साताऱ्यात चार रुग्ण आढळले; गावकरी भयभीत
पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातही जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण सापडण्याचे प्रकार सुरुच आहे. पुणे,सोलापूर, नागपूर पाठापाठ आता सातारा येथे देखील...
अंगात 103 ताप असतानाही पावसात शूट केलं गाणं; माहितीये ही अभिनेत्री नक्की कोण?
वाढलेली दाडी-केस, अंगावर फाटके कपडे; आमिर खान असा रस्त्यावर का फिरतोय? ओळखणेही कठीण
lifestyle news – नियमित एक केळं खाल्ल्याने हा होईल फायदा
Manoj Jarange Patil – ‘आता समोरासमोरची लढाई होणार’, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित
राजकुमार राव अन् पत्रलेखा आई-बाबा होणार?; अभिनेत्याने इंस्टा पोस्टवर स्पष्टच सांगितलं
स्मार्ट वॉच वापरताय? ठरू शकतं जीवघेणं, कसं ते पाहा