जो भावाचा नाही झाला, तो आमचा काय होणार? गनिमी कावा करणार; भरतशेठ गोगावले यांचं मोठं विधान

जो भावाचा नाही झाला, तो आमचा काय होणार? गनिमी कावा करणार; भरतशेठ गोगावले यांचं मोठं विधान

सध्या रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर नाराजीनाट्य सुरू झालं. मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील सुरू होती. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. मात्र पूर्वी ज्यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री म्हणून झाली आहे, तेच प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करतील असं ठरलं होतं. त्यामुळे आज आदिती तटकरे यांनी झेंडावंदन केलं.  यावर बोलताना आता भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनीत तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले भरत गोगावले? 

मंत्री म्हणून त्यांनी झेंडावंदन केलं, आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही. जर मी काही चुकीचं काम केलं असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर यावेळी बोलताना त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे, तटकरे यांचं नाव न घेता हल्लाबोल केला. जो भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार, आव्हान स्किकारून चालतो तोच यशस्वी होतो. मंगळवारी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, काही गोष्टी या गनिमी काव्याच्या असतात, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी देखील आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री या आदिती तटकरे होत्या,  त्यांना वैतागून आम्ही रायगड जिल्ह्यातल्या तीन आमदारांनी उठाव केला, आणि त्यानंतर गुवाहाटीचं लोण संपूर्ण राज्यात पसरलं. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं. पण इतकं होऊन सुद्धा सुनील तटकरे यांची महायुतीच्या सरकारमध्ये मागच्या दाराने एन्ट्री झालीच,  आणि पुन्हा एकदा त्यांची जादू चालली. त्यांनी मुलीला मंत्री बनवलं पण पालकमंत्री हे उदय सामंत होते.

आता पुन्हा दुसऱ्यांदा महायुतीची सत्ता आली यावेळेस सुनील तटकरे यांनी जादू केली आणि आपल्या मुलीला पालकमंत्रिपद दिलं. त्यांच्याकडे काय जादू आहे ते माहित नाही. आम्ही पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले यांचं नाव फायनल केलं होतं, पण ते रात्रीतून कसं बदललं असा प्रश्न दळवी यांनी उपस्थित केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाडेवाढीचा कंडक्टरच्या खिशांवर बोजा, महामंडळाचा उपाय म्हणजे आजार परवडला पण उपचार नको ! भाडेवाढीचा कंडक्टरच्या खिशांवर बोजा, महामंडळाचा उपाय म्हणजे आजार परवडला पण उपचार नको !
एसटी महामंडळाने २५ जानेवारी २०२५ पासून १५ टक्के भाडेवाढ केल्यानंतर गोंधळ उडाला आहे. ही भाडेवाढ करताना पाच रुपयांच्या पटीत न...
‘त्या’ कंपन्या धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढवणार? अंजली दमानियांनी अजितदादांकडे सादर केली बॅलेन्स शीट
अयोध्येत तुफान गर्दी, दोन भाविकांचा मृत्यू
Photo – पाहा जवानांच्या ‘बिटींग द रिट्रीट’च्या सरावाची ही सुंदर दृश्ये
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार, हिंदुस्थान चीनमधील उच्चस्तरीय बैठकीत निर्णय
विराट कोहली 13 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, ऋषभ पंतला डच्चू; ‘या’ दिवसापासून सुरू होणार सामना
ईडीची मोठी कारवाई, शेरॉन बायो मेडिसिन लिमिटेडची 80 कोटींची संपत्ती जप्त