Saif Ali Khan Attacked : वांद्रे तलावात दीड तास शोधाशोध, अखेर चाकूचा तुकडा सापडला

Saif Ali Khan Attacked : वांद्रे तलावात दीड तास शोधाशोध, अखेर चाकूचा तुकडा सापडला

बॉलिवूडचा नवाब, अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. आता घटना कशी घडली याची माहिती पोलीस घेत आहेत. तसेच केस भक्कम होण्यासाठी पोलीस आवश्यक ते पुरावे गोळा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरोपीने वापरलेल्या चाकूचा तुकडा मिळवण्यासाठी पोलीस आज आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला घेऊन वांद्रे तलावाजवळ आले होते. या तलावात दीड तास शोधाशोध घेतल्यानंतर अखेर पोलिसांनी चाकूचा तुकडा मिळवला आहे. त्यामुळे पोलिसांच्या हाती सर्वात मोठा पुरावा मिळाला आहे.

आज संध्याकाळी पोलीस आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला घेऊन वांद्रे तलावाच्या इथे आले होते. यावेळी त्याने चाकूचा तुकडा कुठे फेकला याची माहिती घेण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दीड तास तलावात शोधाशोध करून चाकूचा तुकडा मिळवला आहे. हा चाकूचा तुकडा आरोपीने ओळखल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तो प्रयोगशाळेत पाठवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर शहजादने चाकूचा एक तुकडा वांद्रे तलावात फेकला होता. तलवातील खंदकात हा चाकूचा तुकडा फेकण्यात आला होता.

सलूनवाल्याची चौकशी

दरम्यान, सैफवरील हल्ल्यानंतर आरोपी वरळी कोळीवाड्यात आला होता. या ठिकाणी त्याने एका सलूनमध्ये जाऊन दाढी कटिंग केली होती. पोलिसांनी वरळी कोळीवाड्यातील या सलूनवाल्याची चौकशी केली आहे. त्याच्याकडून अधिकची माहिती घेतली आहे. आपली ओळख पटू नये आणि पोलिसांना गुंगारा देता यावा म्हणून त्याने केस कापून लूक बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच सलूनमध्ये ज्याने आरोपीचे केस कापले होते, त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. कोर्टात भक्कम पुरावे सादर करता यावेत म्हणून पोलीस प्रत्येक अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहे.

रिक्षाचालकाची चौकशी

सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात वांद्रे पोलिसांनी एका रिक्षाचालकाला देखील आज पोलिस ठाण्यात बोलविलं होतं. या रिक्षाचालकाचीही पोलिसांनी चौकशी केली. त्याच्याकडूनही आरोपीबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर रिक्षाचालकाने आरोपीला बांद्रा तलाव परिसरात पाहिलं होतं. म्हणून आज पोलिसांनी सदर रिक्षा चालकाला पोलीस ठाण्यात बोलवून त्याची चौकशी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खोटी माहिती दिल्याने गमावली नोकरी, न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार खोटी माहिती दिल्याने गमावली नोकरी, न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार
खोटी माहिती दिल्याने एका महिलेने अनुकंपा नोकरी गमावली. उच्च न्यायालयाने या महिलेला कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला नाही. या महिलेला बडतर्फ...
आज शिवसेनेचा महाकुंभ, अंधेरीतील विराट मेळाव्यात धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात करार केलेल्या कंपन्या हिंदुस्थानीच, परदेशी कंपन्यांचा महाराष्ट्राला प्रतिसादच नाही
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी राज्यभरात विविध उपक्रम, शक्तिस्थळावर निष्ठावंतांची वारी
लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून पैसे परत घेतील आणि योजना बंद करतील; आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर हल्ला
शिंदेंनी गोगावलेंची आंदोलने रोखावीत, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा सल्लावजा इशारा
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त मुंबईत समाजोपयोगी उपक्रम