नशिबवान पिढीच्या नशिबात महाकुंभमेळा! 144 वर्षांनी योग, देव-दानवांच्या युद्धावेळी….

नशिबवान पिढीच्या नशिबात महाकुंभमेळा! 144 वर्षांनी योग, देव-दानवांच्या युद्धावेळी….

जगातला सर्वात मोठा धार्मिक सोहळा प्रयागराजच्या संगमावर सुरु आहे. महाकुंभमेळ्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात एक अख्खं शहर वसवलं गेलंय. गंगा पार करण्यासाठी तात्पुरते 30 पूल उभारण्यात आले आहेत. 4 हजार हेक्टर जमिनीवर महाकुंभचा मेळा आयोजित झालाय. 13 हजार विशेष रेल्वे गाड्या, लाखोंचा फौजफाटा कुंभनगरीत तैनात आहे. तब्बल 15 हजार कोटींचं बजेट तरतूद केलं गेलंय. कारण या महाकुंभ मेळ्यात स्नानासाठी तब्बल 40 कोटी लोक येण्याचा अंदाज आहे, म्हणजे महासत्ता अमेरिकेची जितकी लोकसंख्या नाही, त्याहून जास्त लोक प्रयागराजमधल्या महाकुंभनगरीत स्नान करणार आहेत. महाकुंभमेळ्याचं महत्व काय, तो कशासाठी आणि दर 12 वर्षांनीच का भरतो? ते समजून घेऊयात.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, कुंभमेळा समुद्रमंथनाशी संबंधित आहे. समुद्रमंथनातून निघालेला अमृत कलश मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झालं. तब्बल १२ दिवस हे युद्ध चाललं. मान्यतेनुसार देवाधिकांचे १ दिवस हे मानवांसाठी १ वर्षाबरोबर आहेत. म्हणून दर १२ वर्षांनी एकदा कुंभमेळा होतो. देव-दानवांच्या युद्धावेळी अमृत कलशातून ४ थेंब पृथ्वीच्या ज्या भागावर पडले, त्याच चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. ती चार ठिकाणं म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि आपलं नाशिक!

यंदाचा महाकुंभमेळा विशेष का?

यंदाचा महाकुंभमेळा विशेष का? त्यासाठी इतके कोट्यवधी लोक स्नानासाठी का पोहोचत आहेत? कारण, यंदाचा मेळा हा महाकुंभमेळा आहे. जो दर १२ वर्षांनी नव्हे तर ग्रह-ताऱ्यांच्या दुर्मिळ स्थितीनुसार तब्बल १४४ वर्षांनी एकदा येतो. म्हणजे याआधीचा महाकुंभमेळा हा 1881 च्या दरम्यान होता आणि यानंतरचा महाकुंभमेळा सन 2169 ला होईल. जर तुम्ही पस्तीशीत असाल तर याआधीच्या महाकुंभमेळ्याला तुमच्या आजोबाचांही जन्म झाला नसेल, आणि यापुढच्या महाकुंभमेळ्याला आपले नातू देखील हयात नसतील.

महाकुंभ मेळाव्यात नियोजन कसं?

गर्दीच्या नियोजनासाठी कुंभमेळा नगरीत ५ भाग तयार करण्यात आले आहेत. पहिल्या परेड ग्राऊंड विभागात 1 ते 5 सेक्टर आहेत, फाफामऊ भागात 10 ते 6 सेक्टर. झुंसी उत्तर विभागात 11 ते 19, झुंसी दक्षिणेत 20 ते 22
आणि अरैलमध्ये 23 ते 25 सेक्टर अशी विभागणी केली गेलीय.

फाफामऊ भागातून प्रतापगड, सुलतानपूरसह वरच्या राज्यातून आलेल्या लोकांना प्रवेश आहे. झुंसी उत्तरेत बनारस, जौनपूरसहीत बिहार भागाकडेच्या लोकांना प्रवेश देण्यात येईल. झुंसी दक्षिणचे ३ सेक्टर सारे साधू-संत, त्यांचे आखाडे यांच्यासाठी बनवण्यात आले आहेत. प्रयागराज शहरासहीत कानपूरकडच्या भागातले लोकांना परेड ग्राऊंड भागातून मेळ्यापर्यंत जाता येईल. अरैल भागातून चित्रकूट, मध्य प्रदेशसह इतर राज्यातल्या लोकांचा प्रवेश होईल.

कुंभमेळ्यासाठी जे तात्पुरत्या स्वरुपात टेंटचं शहर उभारण्यात आलंय, ते याच अरैल भागात आहे. इथं निवासाचीही व्यवस्था करण्यात आलीय. फक्त विभागच नव्हे तर साधू-संत, सर्वसामान्य लोक, प्रशासनाचे अधिकारी अशा सर्व लोकांना सेक्टरमध्ये वाटण्यात आलंय. यमुना नदी आणि गंगा नदी या दोन्ही नद्यांचं याठिकाणी संगम होतं, त्याच स्थळावर जवळपास ४० कोटी लोक स्नानासाठी येण्याचा अंदाज आहे.

कुंभमेळ्याचे एकूण 4 प्रकार

धारणेनुसार कुंभमेळ्यावेळी पवित्र असणाऱ्या गंगा-यमुना आणि सरस्वती नदीच्या संगमस्थळी डुबकी मारल्यास मोक्षाची प्राप्ती होते. फक्त भारतातूनच नव्हे तर जगभरातून हिंदू धर्माला मानणारे अनेक लोक प्रयागनगरीत दाखल झाले आहेत. कुंभमेळ्याचे एकूण 4 प्रकार आहेत. कुंभमेळा हा दर ४ वर्षांनी एकदा होतो. अर्ध कुंभ मेळा दर 6 वर्षातून एकदा, पूर्ण कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा आणि यंदा भरलेला महाकुंभमेळा हा 144 वर्षांनी एकदाच येतो.

हिंदू धर्मातल्या ज्योतिषीशास्रात सूर्य आणि गुरु या दोन्हींना मोठं महत्व आहे. त्यांच्याच दुर्मिळ योगातून जी खगोलीय स्थिती निर्माण होते, त्यानुसार कुंभमेळ्यांचं आयोजन होतं. गुरु हा सूर्यमंडळातला सर्वात मोठा ग्रह आहे. दरवर्षातून सूर्य एकदा मकर राशीत प्रवेश करतो. त्या तिथीला आपण मकरसंक्रांत साजरी करतो आणि दर १२ वर्षांनी गुरु वृषभ राशीत एकदा आल्यावर कुंभमेळा होतो. मात्र यंदा शनि देखील कुंभ राशीत आल्यामुळे हा दुर्मिळ योगायोग १४४ वर्षांनी एकदा आलाय. पोर्णिमेपासून पहिलं स्नान सुरु झालेल्या या महाकुंभमेळाव्याची सांगता ही 25 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटच्या स्नानाने होईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘खूप आव्हानात्मक दिवस,अजूनही परिस्थिती…,’सैफवरील हल्ल्यानंतर काय म्हणाली करीना ‘खूप आव्हानात्मक दिवस,अजूनही परिस्थिती…,’सैफवरील हल्ल्यानंतर काय म्हणाली करीना
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील राहत्या निवासस्थानी अ‌ज्ञाताने हल्ला केल्यानंतर सैफ अली खानची पत्नी करीना कपूर हीने...
HPV लस मुलांसाठी का महत्वाची? जाणून घ्या
एका चार्जमध्ये मुंबईहून पुणे गाठते, 1 लाख रुपयांत लॉन्च होणार ‘ही’ इलेक्ट्रिक कार
महिंद्राचा ग्राहकांना धक्का, Thar ROXX महागली; जाणून घ्या नवीन किंमत
नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होकर्णा येथील शेतकर्‍याने संपवलं जीवन
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी नासा आणि इस्त्रो केंद्रांना भेट देणार, 56 विद्यार्थी पात्र
मोठी बातमी! ‘त्या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे भेटणार नाहीत; यादीत तुमचं तर नाव नाहीना?