सीनदरम्यान अभिनेत्याच्या ओठांचा स्पर्श होताच अभिनेत्रीला उलट्या; 100 वेळा दात घासले अन् तोंड धुतलं

सीनदरम्यान अभिनेत्याच्या ओठांचा स्पर्श होताच अभिनेत्रीला उलट्या; 100 वेळा दात घासले अन् तोंड धुतलं

बॉलिवूड सिनेमा, वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स आजकाल अगदी सामान्य बाब झाली आहे. बोल्ड सीन्स किंवा एखादा किसींग सीन हा चित्रपटात असतोच असतो. तसं कलाकारांना आधीच सांगण्यातही येतं.

पण हे आजच्या चित्रपटांमध्ये सहज शक्य असलं तरी ते 80, 90 च्या दशकातील चित्रपटांसाठी आणि त्यावेळच्या कलाकारांसाठी अगदी सहज शक्य होत नव्हतं. बोल्ड किंवा किसींग सीन म्हणजे त्यांच्यासाठी एका मोठा टास्क असायचा. आणि शक्यतो कलाकार अशा सीन्ससाठी तयारही होत नसत.

‘त्या’ सीननंतर अभिनेत्रीला खूप त्रास सहन करावा लागला

असाच एक विचित्र किस्सा एका अभिनेत्रीसोबत घडला होता. या अभिनेत्री अशा बोल्ड आणि किसींग सीन्ससाठी कधीच होकार दिला नाही. कारण चित्रपटात रोमान्स आणि बोल्ड असणं यात फार फरक असल्याचं तिचं म्हणणं आहे.पण तिच्याबरोबरच एका चित्रपटावेळी एका सीन दरम्यान जे झालं त्यामुळे अभिनेत्रीला खूप त्रास सहन करावा लागला.

या अभिनेत्रीने 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सलमान खान ते अजय देवगण यांसारख्या स्टार्ससोबत ऑन-स्क्रीन रोमान्स केला होता पण कोणतेही बोल्ड सीन न देता. ही अभिनेत्री म्हणजेच रवीना टंडन.

अभिनेत्याच्या ओठांचा अचानक तिच्या ओठांना स्पर्श झाला

रवीना टंडनने 1991 मध्ये ‘पत्थर के फूल’या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.तिने आपल्या सौंदर्यांने आणि आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. कर्तृत्वाच्या जोरावर इंडस्ट्रीत नाव कमावलं होतं.

तिने ऑन-स्क्रीन कोणतेही इंटिमेट सीन कधीही केले नाहीत, पण एकदा शूटिंगदरम्यान अचानक तिच्या ओठांना एका अभिनेत्याच्या ओठांचा स्पर्श झाला. तिच्यासाठी ही गोष्ट प्रचंड अस्वस्थ करणारी होती.

मळमळ अन् उलट्या झाल्या 

एका मुलाखतीत रवीना टंडनाने हा प्रसंग सांगितला. ती म्हणाली होती, “शूटिंगदरम्यान अभिनेत्याच्या ओठांना अचानक स्पर्श झाला. ही गोष्ट चुकून झाली होती. पण मी अस्वस्थ झाले होते. मला आठवतंय की मी एका पुरुष अभिनेत्यासोबत रफ हँडलिंग सीन करत होते. मला आठवतं की चुकून त्याच्या ओठांना स्पर्श मला झाला. हे चुकून घडलं होतं, त्यात कोणाची चूक नव्हती.

त्या सीननंतर मी माझ्या खोलीत गेले आणि मला उलट्या झाल्या कारण मला अजिबात हे आवडलं नव्हतं. शॉट संपला आणि मला मळमळ होऊ लागली. मी वरच्या मजल्यावर गेले. मला ते सहन होत नव्हतं. शी नाही प्लिज तु तुझे दात घास, शंभर वेळा तोंड धु’असं मी स्वत:ला सांगत होते.”

हा किस्सा सांगितल्यानंतर रवीना त्या सीननंतर किती अस्वस्थ झाली होती हे तिने सांगितले. पण रवीनाने हा प्रसंग सांगताना तिने त्या अभिनेत्याचे नाव अजिबात उघड केले नाही.


अभिनेत्यानं मागितली माफी

रवीना टंडनने पुढे सांगितले की, या घटनेनंतर त्या अभिनेत्यानेही तिची माफी मागितली होती आणि अभिनेत्रीनं त्याला माफही केलं होतं कारण तिच्या म्हणण्याप्रमाणे ती गोष्ट चुकून घडली होती.

ती म्हणाली की, “जर मला एखादी गोष्ट करण्यात कम्फर्ट वाटत नसेल तर मी ते करणार नाही. तो खलनायकाच्या भूमिकेत होता. तो खूप माफी मागत होता पण हे चुकून घडलं होतं, असं मी त्याला सांगितलं.” रवीनाने सांगितल्याप्रमाणे ती अशा सीन्ससाठी कधीही तयार नव्हती. त्यामुळे तिने कधीही असे सीन दिले नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमिताभ बच्चन यांची पोस्ट व्हायरल; चाहते बिग बींच्या प्रकृतीबद्दल चिंतेत अमिताभ बच्चन यांची पोस्ट व्हायरल; चाहते बिग बींच्या प्रकृतीबद्दल चिंतेत
संगम शहर प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झाला आहे. मोठ्या संख्येने भाविक स्नानासाठी येत आहेत. कडाक्याच्या थंडीतही भक्तांची श्रद्धा कमी पडताना दिसत...
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा न्यायालयीन समिती करणार तपास
Sadhvu Harsha Richhariya – महाकुंभमध्ये चेहऱ्याचं सौंदर्य महत्त्वाचं नसतं, साध्वी हर्षा रिछारिया यांच्यावर संतापले शंकराचार्य
रशियाचा युक्रेनवर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, 100 ठिकाणांवर क्रूझ क्षेपणास्त्रे डागली
परळीतील धनंजय मुडेंच्या टोळ्या आणि दहशत संपवली पाहिजे; मनोज जरांगे पुन्हा आक्रमक
सीनदरम्यान अभिनेत्याच्या ओठांचा स्पर्श होताच अभिनेत्रीला उलट्या; 100 वेळा दात घासले अन् तोंड धुतलं
लंडनमध्ये पँटशिवाय फिरतायत तरुण-तरुणी, काय आहे ‘नो ट्राउजर ट्यूब राइड’? जाणून घ्या…