तारक मेहता… फेम रोशन सिंग सोढीने अन्न, पाणी सोडलं, प्रकृती चिंताजनक
गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना कलाकारांच्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी देखील आल्या. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून रोशन सोढी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंग त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
मंगळवारी गुरुचरणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. अभिनेत्याची मैत्रीण भक्ती सोनी हिने देखील गुरुचरण याच्या प्रकृतीबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्याने अन्न पाणी सोडल्याचं भक्ती हिने सांगितलं आहे.
आता गुरुचरण याची को-स्टार जेनिफर मिस्त्री बंसीवाल हिने देखील अभिनेत्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘गुरुचरण गेल्या अनेक दिवसांपासून कर्जात आहे. मी गुरुचरण याला निर्माता जायझ याच्याकडून पैसे मागण्याचा सल्ला दिला. पण गुरुचरण याने पैसे मागितले नाहीत…’
‘गुरुचरण आणि मला बिग बॉससाठी विचारण्यात आलं होतं. शोच्या निर्मात्यांसोबत बोलणं देखील झालं होतं. पण काही होऊ शकलं नाही. पैशांसाठी गुरुचरण पूर्णपणे बिग बॉसवर आधारित होता. बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून काम मिळालं असतं तर आर्थीक अडचणी कमी झाल्या असत्या…’
‘पण गोष्टी मार्गी लागल्या नाहीत… बिग बॉसमध्ये काम न मिळाल्यामुळे गुरुचरण याची प्रकृती खालावली आहे… असं मला वाटतं. त्याने अन्न पाणी देखील सोडलं आहे.’ असं जेनिफर मिस्त्री बंसीवाल म्हणाली आहे. चाहत्यांनी देखील गुरुचरण याच्यासाठी चिंता व्यक्त केली आहे.
सांगायचं झालं तर, गेल्या वर्षी गुरुचरण सिंग अचानक त्याच्या घरातून गायब झाल्यामुळे चर्चेत होता. जवळपास महिनाभर पोलीस त्याचा शोध घेत होते. वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर जवळपास तीस दिवसांनंतर गुरुचरण सुखरुप त्याच्या घरी परतला होता. त्यावेळी त्याने कर्जबाजारी झाल्याचं आणि हाती कोणतंही काम नसल्याचा खुलासा केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List