…तर माझं आयुष्य नरकचं बनलं असतं, रेखा – अमिताभ बच्चन यांच्या नात्यावर जया बच्चन यांची प्रतिक्रिया
महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण खासगी आयुष्यात देखील दोघांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. अमिताभ बच्चन विवाहित असताना देखील रेखा यांच्या प्रेमात होते… अशा चर्चा आजही रंगलेल्या असतात. सांगायचं झालं तर, रेखा यांनी अनेकदा अमिताभ बच्चन यांच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. पण अमिताभ बच्चन यांनी कधीच रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं नाही.
एका मुलाखतीत अभिनेत्री जया बच्चन यांनी देखील रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं. मुलाखतीत रेखा म्हणाल्या होत्या, ‘मी फक्त त्यांना एकांत दिला. तुम्हाला पूर्ण विश्वास असायला हवा. मी एक उत्तम पुरुष आणि अशा कुटुंबासोबत लग्न केलं आहे जो शब्दाचा पक्का आहे. म्हणून तुम्हाला अधिकार गाजवण्याची गरज नसते.’
जया बच्चन पुढे म्हणाल्या, ‘आमचं प्रोफेशन असं आहे, जेथे गोष्टी सहज सोप्या नसतात. तुम्ही कलाकाराला वेड लावू शकता किंवा तुम्ही त्याला पुढे जाण्यास मदत करू शकता. आणि जर तो गेला तर तो कधीच तुमचा नव्हता! नकारात्मक गोष्टींवर मी कधीच लक्ष देत नाही…
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या नात्यावर जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली होती. ‘रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत. चर्चांमध्ये काही तथ्य असतं तर आज ते कुठे असते? लोकांनी रेखा – अमिताभ बच्चन यांच्या ऑन-स्क्रिन जोडीला डोक्यावर घेतलं. यावर मला काहीही हरकत नाही.’
जया बच्चन पुढे म्हणाल्या, ‘अनेक अभिनेत्रींसोबत अमिताभ बच्चन यांचं नाव जोडण्यात आलं. जर मी ते गांभीर्याने घेतलं असतं तर माझं आयुष्य नरक बनलं असतं.’ असं दखील जया बच्चन म्हणाल्या होत्या.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिलसिला’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. . अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी 3 जून 1973 रोजी लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List