तर असा दिसतो ज्युनियर कोहली..; विराट-अनुष्काच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल, दिसला चेहरा

तर असा दिसतो ज्युनियर कोहली..; विराट-अनुष्काच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल, दिसला चेहरा

अभिनेत्री अनुष्का शर्माने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुलगा अकायला जन्म दिला. त्याआधी जानेवारी 2021 मध्ये तिने मुलगी वामिकाला जन्म दिला होता. विराट आणि अनुष्काने त्यांच्या दोन्ही मुलांचा चेहरा माध्यमांपासून, पापाराझींपासून लपवला होता. फोटोग्राफर्सनाही त्यांनी विशेष विनंती करून मुलांचे फोटो न काढण्यास सांगितलं होतं. जरी कोणी चुकून वामिका किंवा अकायचे फोटो आणि व्हिडीओ काढले तरी तते सोशल मीडियावर लीक होणार नाही, याची ते विशेष काळजी घेताना असतात. अशातच विराट-अनुष्काचा मुलगा अकायचा चेहरा अखेर सोशल मीडियावर समोर आला आहे. मुंबई विमानतळावरील हा व्हिडीओ असून अनुष्काने अकायला कडेवर उचलून घेतलंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून त्यात अकायचा चेहरा स्पष्ट पहायला मिळतोय.

विराट आणि अनुष्का यांनी सुरुवातीपासून त्यांच्या मुलांचा चेहरा सोशल मीडियावर लीक होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली. इतकंच नव्हे तर देशातील पापाराझींना वैतागून ते लंडनला स्थित झाल्याचंही म्हटलं गेलं. अनुष्कासुद्धा अकायच्या जन्मानंतर लंडनमध्येच राहत होती. गेल्या काही दिवसांपासून विराट आणि अनुष्का हे भारतात आले आहेत. भारतात आल्यानंतर त्यांनी वृंदावनला जाऊन अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांचं दर्शन घेतलं. आपल्या दोन्ही मुलांसोबत त्यांनी प्रेमानंद यांचा आशीर्वाद घेतला. या आश्रमातील व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र त्यातही वामिका किंवा अकायचा चेहरा दिसला होता.

आता विराट-अनुष्काच्या फॅन पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून त्यावरील कमेंट्स ‘ऑफ’ करण्यात आले आहेत. म्हणजेच नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्स करू शकणार नाहीत. मात्र या व्हिडीओला अवघ्या काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनुष्काच्या कडेवर असलेला चिमुकला अकाय आजूबाजूच्या लोकांकडे अत्यंत कुतूहलाने पाहत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय.

अनुष्का आणि विराटने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सोशल मीडियावर पोस्ट लिहित मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. ‘आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होतोय की 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमचा मुलगा अकाय आणि वामिकाच्या छोट्या भावाचं स्वागत केलं. आमच्या आयुष्यातील या अत्यंत सुंदर क्षणी आम्हाला केवळ तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘बिग बॉस’चे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात..; पूर्व विजेती शिल्पा शिंदे मोठा दावा ‘बिग बॉस’चे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात..; पूर्व विजेती शिल्पा शिंदे मोठा दावा
‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले येत्या 19 जानेवारी रोजी पार पडणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात आठ स्पर्धक असून त्यांच्यामध्ये...
…तर माझं आयुष्य नरकचं बनलं असतं, रेखा – अमिताभ बच्चन यांच्या नात्यावर जया बच्चन यांची प्रतिक्रिया
बॉलीवूड स्टार्सच्या बॉडीगार्ड्सचे पगार असतात लाखोंच्या घरात? आलिया भट्टच्या बॉडीगार्डने थेट सांगितले आकडे
लग्न करून आयुष्य उद्ध्वस्त; ‘महाभारत’ फेम अभिनेत्याचा घटस्फोट, AI इंजीनिअर अतुल सुभाषशी केली तुलना
मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्त केली शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा
आमच्या कुटुंबातील सदस्याचं बर वाईट झाल्यानंतर सरकार आम्हाला न्याय देणार का? वैभवी देशमुखचा सवाल
10 रुपयांसाठी बसमध्ये तुफान हाणामारी, कंडक्टर आणि निवृत्त IAS अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल