बेबी बंपसह दिसली अथिया शेट्टी; अनुष्का शर्मासोबतचा व्हिडीओ व्हायरल
नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्री अथिया शेट्टीने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली. अथिया आणि क्रिकेटर केएल राहुल लवकर आई-बाबा बनणार आहेत. ‘2025 मध्ये आमच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होईल’, अशी पोस्ट लिहित त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली होती. या पोस्टनंतर आता पहिल्यांदाच अथियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियामधून तिचा हा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये तिचा बेबी बंप सहज पहायला मिळतोय. अथिया आणि अनुष्का शर्मा या दोघींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचेस सुरू आहेत. या मॅचेसदरम्यान केएल राहुल, विराट कोहली आणि भारतीय टीमला पाठिंबा देण्यासाठी अथिया आणि अनुष्का ऑस्ट्रेलियाला पोहोचल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये अथिया आणि अनुष्का या मेलबर्न स्टेडियममधून बाहेर पडताना दिसून येत आहेत. यावेळी दोघींनीही कॅज्युअल कपडे परिधान केले आहेत. या व्हिडीओमध्ये अनुष्का अथियाच्या पुढे चालताना दिसतेय. तिच्या मागे अथिया एका व्यक्तीशी बोलत चालताना पहायला मिळतेय. टॉप आणि डेनिम स्कर्ट असा तिचा लूक आहे. मॅचदरम्यान तिने नितीश रेड्डीच्या वडिलांचीही भेट घेतल्याचं कळतंय.
Anushka Sharma and Athiya Shetty meet with Nitish Reddy’s father at MCG.#AUSvIND #INDvsAUS #MCG #nitishreddy#anushkasharma#athiyashettypic.twitter.com/M21afMwpIm
— RAJASTHANI MAN (@rajasthaniman1) December 29, 2024
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी 2023 मध्ये लग्नगाठ बांधली. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बंगल्यात हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. अथिया आणि राहुल लग्नाआधी काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. पहिल्या भेटीतच दोघांची चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनीसुद्धा सोशल मीडियावर अथियाच्या डेटिंग लाइफविषयी हिंट दिली होती. 2021 मध्ये अथियाच्या वाढदिवशी केएल राहुलने तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत रिलेशनशिप जाहीर केलं होतं.
अथियाने वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला. 2015 मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून किने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘मुबारकां’ आणि ‘मोतीचूर’ या दोन चित्रपटांमध्येच झळकली. मात्र अथियाला फिल्म इंडस्ट्रीत अपेक्षित यश मिळालं नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List