पुण्यातील भाविकांच्या बसला अपघात; दोन ठार; 32 जखमी
श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असलेल्या पुणे जिह्यातील भाविकांच्या खासगी बसचा व मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. आज सकाळी पंढरपूरजवळील भटुंबरे गावानजीक झालेल्या अपघातात दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला. तर चालकासह 32 प्रवाशी गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी पंढरपूर व सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेबाबाई सोपान म्हाळसकर (66, रा. नाणे मावळ, ता. मावळ, जि. पुणे), जान्हवी ऊर्फ धनू विठ्ठल म्हाळसकर, (7, रा. नाणे मावळ, ता. मावळ, जि. पुणे) अशी मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत.
पुणे येथील भाविक खासगी बसने टेंभुर्णीकडून पंढरपूरकडे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत होते. या भाविकांची बस आणि पंढरपूरकडून टेंभुर्णीकडे निघालेल्या मालवाहू ट्रकची भटुंबरे गावच्या हद्दीत आज सकाळी सहाच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. ह.भ.प. तुकाराम खेडलेकर महाराज मठासमोर हा अपघात झाला. अपघातात बस आणि ट्रकचा समोरच्या भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन महिला भाविक ठार झाल्या, तर 32 जण जखमी झाले. यातील बारा जखमींना सोलापूर सिव्हील हॉस्पिटलला दाखल केले आहे.
अपघात झाला तेव्हा प्रचंड आवाज झाल्याने गावकरी धावत आले. या वेळी अनेक जखमी भाविक ओरडत होते. ग्रामस्थांनी त्यांना बसमधून बाहेर काढले. जखमींना पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या पथकाकडून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमींची नावे
प्रियांका रणजित पिंपळे (26, रा. पिंपलोळी), रणजित पिंपळे (1, रा. पिंपलोळी), सार्थक संतोष राक्षे (17, रा. चाकण), अंजली संतोष राक्षे (34, रा. खेड चाकण), साक्षी विठ्ठल म्हालस्कर (13, रा. नाणे कामशेत), वनिता विठ्ठल म्हालस्कर (35), हिरामण दत्तू म्हालस्कर (46), श्रद्धा सलू म्हालस्कर (35), साधू नथ्थू म्हालस्कर (58), पूजा विशाल म्हालस्कर (28), रियांश विशाल म्हालस्कर (दीड वर्ष), त्रिषा विशाल म्हालस्कर (8), रिया विशाल म्हालस्कर (6), गिरिजा रघुनाथ म्हाळस्कर (35), चिमाजी नथ्थू म्हालस्कर (60), प्रांजली रामदास म्हालस्कर (12), शिवण्या रघुनाथ म्हालस्कर (7), भामाबाई चिमाजी म्हालस्कर (60), कांता गणपत म्हालस्कर (60), सुरेश साधू म्हालस्कर (55), विशाल साधू म्हालस्कर (40), रघुनाथ गोटीराम म्हालस्कर (45), संभाजी शिवाजी म्हालस्कर (95, सर्व रा. नाणे कामशेत लोणावळा), आराध्या धनाजी शेलार (10, रा. शेलावरवाडी लोणावळा), बबन नथ्थू येवाळे (50, रा. चिलाटने कारला), शुभांगी संतोष गरुड (34, रा. टाकणे खुर्द), संदीप नामदेव गरुड (37, रा. टाकणे खुर्द), सुरेखा सुभाष जाधव (40), सुभाष देवरंग जाधव (46), हर्षदा संतोष राक्षे (16), संतोष मारुती राक्षे (40, सर्व रा. राक्षेवाडी चाकण) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List