Year Ender: Oneplus ते Samsung; 2024 मध्ये 25,000 रुपयांच्या बजेटमध्ये लॉन्च झाले ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन

Year Ender: Oneplus ते Samsung; 2024 मध्ये 25,000 रुपयांच्या बजेटमध्ये लॉन्च झाले ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन

वर्ष 2024 संपायला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या वर्षात स्मार्टफोन कंपन्यांनी अनेक जबरदस्त फोन लॉन्च केले आहेत. अलीकडे Asus, Vivo आणि Nokia (HMD Global) सारख्या कंपन्यांनीही त्यांचे फोन लॉन्च केले आहेत. जर तुम्हाला 25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये चांगला फोन घ्यायचा असेल, तर तुम्हाला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर ते फ्लॅगशिप ग्रेड प्रोसेसर आणि मल्टीपल कॅमेरा सेटअपसह स्मार्टफोन मिळतील. यातच आम्ही तुम्हाला 25,000 रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत…

OnePlus Nord 3 5G

OnePlus Nord 3 5G जुलै 2023 मध्ये लॉन्च झाला. हा फोन 120 Hz रिफ्रेश रेट 6.74-इंचाच्या टचस्क्रीन डिस्प्लेसह येतो. याचे रिझोल्यूशन 1240×2772 पिक्सेल आहे. OnePlus Nord 3 5G फोन octa-core MediaTek Dimension 9000 प्रोसेसरसह येतो. हा फोन प्रोप्रायटरी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.   हा फोन अँड्रॉइडवर चालतो आणि त्यात 256 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे.

हा स्मार्टफोन तुम्ही 25 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वरून OnePlus Nord 3 5G (Tempest Grey, 128 GB, 8 GB RAM) 21,065 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय या फोनच्या खरेदीवर अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत.

Samsung Galaxy A35 5G

Samsung Galaxy A35 5G स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.60 इंचाचा डिस्प्ले मिळेल. यात 6 GB आणि 128 GB स्टोरेज आहे. फोनमध्ये 50 MP + 8 MP + 5 MP चा कॅमेरा आहे. तसेच यात 13 MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर यात 5000 mAh ची मोठी बॅटरी देखील आहे.

जर तुम्ही 25 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन शोधत असाल तर Samsung Galaxy A35 5G हा पर्याय उत्तम ठरू शकतो. तुम्ही हा फोन 8GB रॅम, 128GB स्टोरेजसह Amazon वरून 36 टक्के डिस्काउंटसह 21,719 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Nothing Phone 2a Plus

Nothing Phone 2a Plus स्मार्टफोनमध्ये 6.70 इंच डिस्प्ले आहे. यात 8 GB आणि 256 GB स्टोरेज आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. याच्या मागील कॅमेरा 50 MP + 50 MP आहे. तर फ्रंट कॅमेरा 50 MP सह उपलब्ध आहे.

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही नथिंग फोन (2a) प्लस (ब्लॅक, 256 जीबी, 8 जीबी रॅम) 26,999 रुपयांना फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. यामध्ये अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन Amazon वरून 25,320 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Realme 12 Pro+ 5G

Realme 12 Pro+ 5G मध्ये तुम्हाला 6.70 इंच डिस्प्ले मिळेल. यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजची सुविधा आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची मोठी बॅटरी देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये 50 MP + 64 MP + 8 MP रियर कॅमेरा आहे. याशिवाय फ्रंटमध्ये 32 एमपी फ्रंट कॅमेराही उपलब्ध आहे.

तुम्ही हा फोन (Explorer Red, 8GB RAM, 256GB स्टोरेज) Amazon वरून 23,599 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्हाला याच्या खरेदीवर अनेक बँक ऑफर देखील मिळतील. तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून 26,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Vivo T3 Pro 5G

Vivo ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Vivo T3 Pro 5G लॉन्च केला आहे. Vivo T3 Pro 5G ची एंट्री-लेव्हल व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये. ज्यामध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे.

हा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज पर्यायांसह विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. Vivo T3 Pro 5G मध्ये मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्रायमरी वाइड-एंगल लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहेत. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO F27 5G

OPPO F27 5G 20 स्मार्टफोन ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च झाला. हा फोन Android 14 ला सपोर्ट करतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. Oppo चा हा फोन 128GB, 256GB स्टोरेज सह खरेदी करता येईल. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल (f/1.8) आहे.

तुम्ही OPPO F27 5G (Emerald Green, 128 GB, 8 GB RAM) फोन 20,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय यावर अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिवसाची सुरुवात या 5 पदार्थांपासून चुकूनही करु नका, अन्यथा दिवसभर पश्चाताप होईल दिवसाची सुरुवात या 5 पदार्थांपासून चुकूनही करु नका, अन्यथा दिवसभर पश्चाताप होईल
कॉफी - कॉफीमध्ये कॅफीन असते. जे आपल्या शरीराला अलर्ट करीत असते. रिकाम्या पोटी जर कॉफी पिली तर आपल्याला एसिडीटी होण्याची...
पाळधी हिंसाचाराप्रकरणी सात जणांना अटक, सकाळी सहा वाजता कर्फ्यू हटवला जाईल; पोलिसांची माहिती
दोषी नव्हता मग वाल्मीक कराड फरार का होता? आमदार संदीप क्षीरसागर याचा सवाल
देवगड तालुक्यात नववर्षाचा जल्लोष, विजयदूर्ग किल्ल्यावर रंगणार दिपोत्सवाचा सोहळा
नववर्षात मुंबईत बेशिस्त वाहनचालकांना दणका, 17800 जणांवर कारवाई; दंडामुळे सरकारी तिजोरीत भर
दापोलीत नव वर्षाच्या स्वागतासाठी तिखटाचा बेत; मटण खरेदीसाठी खवय्यांची गर्दी
शाहरुख खानचा लंडनमधील बंगला म्हणजे आलिशान महालच; फोटो व्हायरल,चाहते मात्र संतापले