एकाच दिवसात 577 मेट्रिक टन राडारोडा, कचऱ्याचे संकलन-विल्हेवाट, 1 हजार 682 कर्मचारी, 201 संयंत्रांची अविरत कामगिरी
मुंबई महापालिकेच्या 24 प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी आज विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात एकाच दिवसात 273 मेट्रिक टन राडारोडा (डेब्रिज) आणि 304 मेट्रिक टन कचऱयाचे संकलन करण्यात आले तर 52 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले. त्याचबरोबर 1 हजार 821 बॅरिकेड्स धुऊन स्वच्छ करण्यात आले. यासाठी 1 हजार 682 कर्मचारी आणि 201 संयंत्रांनी अविरत मेहनत घेतली.
मुंबईत गेल्या 52 आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरूप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण 227 प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. या अंतर्गत शनिवार, 14 आणि रविवार, 15 डिसेंबरला सर्व प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेत विभाग पातळीवर व्यापक कार्यवाही करण्यात आली.
1 हजार 682 कामगार-कर्मचाऱ्यांनी 201 संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध वाहने आणि फायरेक्स मशीन, मिस्टिंग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणा दिमतीला होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List